शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

एमटीडीसीच्या ‘माईन’ पर्यटनासाठी रांगा!

By admin | Updated: January 20, 2017 02:26 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपुरात प्रथमच ‘माईन टुरिझम’ सुरू केले आहे.

पहिलाच प्रयोग : सहलीसाठी १९ पर्यटकांचे बुकिंगनागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपुरात प्रथमच ‘माईन टुरिझम’ सुरू केले आहे. एमटीडीसीच्या या प्रयोगाला पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, २९ जानेवारी रोजी सावनेर तालुक्यातील गोंडेगाव येथे जाणाऱ्या सहलीसाठी तब्बल १९ पर्यटकांनी बुकिंग केले असल्याची माहिती एमटीडीसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ‘माईन टुरिझम’ या सहलीचे मागील १७ डिसेंबर २०१६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल सुद्धा उपस्थित होते. यानंतर पुढील २९ जानेवारी २०१७ रोजी गोंडेगाव येथील माईन पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली सहल रवाना होणार आहे.या सहलीविषयी पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सूकता असून, एमटीडीसीने जय्यत तयारी केली आहे. एमटीडीसीने या सहलीसाठी वातानुकूलीत सुसज्ज अशी बस तयार केली आहे. ही बस २९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसीच्या कार्यालयापासून सुटेल. यानंतर सकाळी १०.३० वाजता बस आदासा येथे पोहोचेल. येथे सकाळी ११ वाजतापर्यंत गणपतीचे दर्शन घेतले जाईल. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता बस ही ईको पार्क येथे पोहोचेल. येथूनच सर्व पर्यटक डब्ल्यूसीएलच्या गेस्ट हाऊसवर जातील. येथे माईन्स पाहण्यासाठी ड्रेस व शूज बदलविले जाईल. यानंतर दुपारी १२ वाजता डब्ल्यूसीएलची अंडरग्राउंड माईन्स पाहण्याचा कार्यक्रम सुरू होईल. शिवाय यानंतर दुपारी १.३० वाजता जेवणाचा कार्यक्रम आटोपून दुपारी २.३० वाजता एमटीडीसीची बस पुन्हा नागपूर येथे पोहोचेल.(प्रतिनिधी) ‘नागपूर दर्शन’ला अल्प प्रतिसाद महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘माईन’ टुरिझमसोबतच मागील महिन्यात नागपूर दर्शनाचा प्रयोग सुद्धा राबविला. परंतु एमटीडीसीच्या या ‘नागपूर दर्शन’ सहलीला फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. एमटीडीसीने प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवारी ‘नागपूर दर्शना’ ची योजना आखली आहे. परंतु या सहलीसाठी पर्यटकच मिळत नसल्याने एमटीडीसीचा हा प्रयोग फसल्याचे दिसून येत आहे.