शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

‘एमआरओ’ची ‘द ग्रेट इंडियन जुगाड सिस्टीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:09 IST

वसीम कुरेशी नागपूर : एकीकडे खासगी एअरलाईन कोरोनाच्या काळातही नवीन विमाने खरेदी करीत आहेत. तर सरकारी एअरलाईन एअर इंडियाची ...

वसीम कुरेशी

नागपूर : एकीकडे खासगी एअरलाईन कोरोनाच्या काळातही नवीन विमाने खरेदी करीत आहेत. तर सरकारी एअरलाईन एअर इंडियाची दोन विमाने नागपुरात कित्येक महिन्यांपासून दुरुस्तीकरिता पडलेली आहेत. या दोन विमानात अमेरिकेपर्यंत उड्डाण केलेल्या बोईंग ७७७ चा समावेश आहे. हे विमान येथे मेेन्टेनन्ससाठी आले होते. हे विमान तर दुरुस्त केलेच नाही पण या विमानाचे शेकडो पार्ट काढून दुरुस्तीस आलेल्या इतर विमानांना लावण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या नागपूर एमआरओमध्ये दोन हँगर आहेत. दोन्ही हँगरमध्ये दोन बोईंग ७७७ आहे.

पहिले विमान २०१९ मध्ये आले होते. सूत्रांच्या मते, एअर इंडियाची आर्थिक बाजू कमकुवत असतानाही २१ जून २०२० पर्यंत १०० विमानांची दुरुस्तीस करण्यात आली होती. या शंभर विमानांच्या दुरुस्तीसाठी बोईंग ७७७ विमानातील साहित्याचा वापर करण्यात आला. लॉकडाऊनदरम्यान ‘वंदे भारत’ अभियानादरम्यान एमआरओवर विमानांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी होती. विदेशातून विमानाचे साहित्य येण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे इतर विमानांच्या दुरुस्तीसाठी एमआरओमध्ये उभ्या असलेल्या विमानातील साहित्याचा वापर करण्यात आला. त्यानंतर ६ महिन्यापूर्वी यूएसएसाठी उड्डाण करणारा ‘व्हीटीएएलटी बोईंग ७७७ सी’ दुरुस्तीसाठी आला होता. या विमानाच्या लॅँडिंग गेअरमध्ये प्रॉब्लेम होता. त्यालाही दुसऱ्या विमानाला दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात आले. आता या दोन्ही विमानांचे कॉकपिट अर्धे रिकामे झाले आहेत. एअर इंडियाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईच्या एमआरओमध्येही दोन्ही विमाने तशीच पडली आहेत.

- शतक केल्यानंतर एक डझनचा आकडाही पूर्ण नाही

सरकारी एअरलाईनचा असा जुगाड कधीपर्यंत सुरू राहतो याचा पत्ता नाही, पण एमआरओमध्ये पडून असलेल्या या विमानांमध्ये मोठ्या अडचणी येऊ शकतात. सूत्रांच्या मते, एमआरओमध्ये जून २०२० पर्यंत शेकडो विमाने दुरुस्त करण्यात आली आहेत. त्यानंतर एमआरओमध्ये एक डझन विमानांचीही दुरुस्ती झाली नाही. नागपूर एमआरओची स्थिती लक्षात घेता, विमाने दुरुस्तीसाठी येथे पाठविण्यात येत नाहीत. कारण कंपनीला याची जाणीव झाली आहे की या दोन विमानांच्या बहुतांश पार्टचा वापर झाला आहे, त्यामुळे नागपूर एमआरओकडून जास्त अपेक्षा ठेवणे योग्य नाही.