अ.भा. किसान संघर्ष समन्वय समितीसह काँग्रेस व आपही रस्त्यावर
नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी दुपारी नागपुरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून समर्थनार्थ घोषणाबाजी केली. केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेधही केला.
अ.भा. किसान संघर्ष समन्वय समिती
- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीनेही संविधान चौकात दुपारी ३ वाजता आंदोलन करण्यात आले. ‘दिल्ली में पहुंचे किसान, संसद की ओर कूच करो, हम तुम्हारे साथ है’ अशी आंदोलनातील मुख्य घोषणा होती. यात विद्यार्थी, कामगार, युवक, महिला, शेतकरी तसेच व्यक्तिगत समर्थन करणारे नागरिकही सहभागी झाले होते. प्रारंभी जिल्हाध्यक्ष अरुण वनकर यांनी प्रास्ताविक केले. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचा आरोप करून निषेध व्यक्त केला. समारोप जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी केला. आंदोलनात अरुणा सबाने, वंदना महात्मे, अमिताभ पावडे, श्यामल संजयवाल, ॲड. अनिल काळे, ओमप्रकाश यादव, श्याम काळे, ज्योती अंडरसहारे, विठ्ठल जुनघरे, मधुकर भरणे, माधव बोंडे, वीरा साथीदार, विजय जावंधिया, विलास भोंगाडे, मारोती वानखेडे, माधव बोंडे, वंदना वनकर, प्रभू राजगडकर, नितीन नायडू, सुरेश रेवतकर आदी सहभागी झाले होते.
नागपूर शहर काँग्रेस
- नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. ब्लॉक क्रमांक १०, प्रभाग क्र. १३ च्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजकुमार कामनानी, उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी, बाबूलाल साहू, सूरज शर्मा, शेखर लसुनते, ॲड. अक्षय समर्थ, राजेश जरगर, उमेश चव्हाण, अजय सूर्यवंशी, सोनू कुरवाने, श्यामसुंदर भगत, लव मसराम, कुश मसराम आदी उपस्थित होते.
गिट्टीखदान चौकात ब्लॉक ११ आणि १२ च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी देवेंद्र रोटेले, प्रमोदसिंह ठाकूर, नागेश राऊत आदी सहभागी झाले.
आम आदमी पार्टी
- आम आदमी पार्टीच्या वतीनेही दुपारी १.३० वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील आंदोलनाला आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला. शेतकरी कायदे रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा व या आंदोलनात सर्वशक्तीनिशी सहभागी होण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. आंदोलनात राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेडे, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय समिती सदस्य अमरीश सावरकर, संयोजक कविता सिंघल, सचिव भूषण ढाकूलकर, संघटनमंत्री शंकर इंगोले, सहसंयोजक प्रशांत निलाटकर, स्वीटी इंदुरकर, दीपाली पाटील, हेमंत दिवाने, अमोल हाडगे आदी सहभागी झाले होते.