शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सेवाग्रामला आंदोलन

By admin | Updated: January 31, 2017 03:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नुकतेच रास्ता रोको

विदर्भ राज्य आंदोलन समिती : ६ एप्रिलला ‘रेल रोको’ नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नुकतेच रास्ता रोको आंदोलन केले होते. विदर्भात ८५ ठिकाणी आंदोलन पार पडले. आता सेवाग्राम (वर्धा) येथे ६ एप्रिल रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी समितीच्या गिरीपेठ येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा व कार्यक्रमही निश्चित करण्यात आला. त्यानुसार ६ एप्रिल रोजी सेवाग्रामला रेल रोको आंदोलन केले जाईल. त्यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी तिरोडा (गोंदिया) येते समितीच्या वतीने महिला मेळावा होईल. यात मायक्रो फायनान्स कंपनीने दिलेल्या कर्जमाफीविषयी चर्चा व निर्णय घेतला जाईल. १० मार्चला यवतमाळला शेतकरी मेळावा होईल. १८ मार्चला बुलडाणा येथे शेतकरी मेळावा होईल. २० मार्चला अमरावतीत तर ३० मार्चला हिंगणघाट येथे महिला मेळावा होईल. तसेच एप्रिल महिन्यात चंद्रपूर येथे विजेचे दर निम्मे करा, लोडशेडिंग बंद करा, विदर्भाला प्रदूषित करणाऱ्या नवीन प्रस्तावित १३२ प्रकल्पांची मान्यता रद्द करा आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येईल. यावेळी अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला अ‍ॅड. मोरेश्वर टेंभुर्डे, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, अ‍ॅड. नंदा पराते, अरुण केदार, धर्मराज रेवतकर, डॉ. ख्वाजा, प्रा. पुरुषेत्तम पाटील, धनंजय धार्मिक, टी.बी. कटरे, अ‍ॅड. अर्चना नंदघरे, अ‍ॅड. माधुरी रहांगडाले, अनिल तिडके, किशोर पोतनवार, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रा. सोपान चिकटे, प्रा. अनिल ठाकूरवार, हिरचंद बोरकुटे, रफीक रंगरेज, ताराबाई बारस्कर, भय्यालाल माकडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) गावाच्या वेशीवर लावणार विदर्भाचे फलक या बैठकीमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीची गावपातळीवर संघटनात्मक बांधणी करणे, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय सुरू करणे, समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या घरावर जय विदर्भचा झेंडा लावणे व संपर्क कार्यालयाची पाटी लावणे तसेच गावाच्या वेशीवर विदर्भाचे फलक लावणे आदी निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी २१ प्रमुख कार्यकर्त्यांची उपसमिती सुद्धा यावेळी गठित करण्यात आली.