शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र बौद्ध कायद्यासाठी मार्चमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:08 IST

देशामध्ये स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉचे .....

ठळक मुद्देमुकुंद खैरे : राष्ट्रीय संविधान हक्क परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशामध्ये स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी रविवारी संविधान हक्क परिषदेमध्ये बोलताना केली.सीताबर्डीतील सांस्कृतिक बचत भवन येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कमिटीचे राष्ट्रीय सल्लागार भदंत प्रियपाल यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सचिव भदंत हर्षबोधी, भदंत शीलकीर्ती, भदंत कुणालकीर्ती, भदंत मोगलायन, भदंत कमाल धम्मो, अ‍ॅड. अर्चना गौतम, विजय बौद्ध, अ‍ॅड. एच. एल. राजे, डॉ. आर. एल. कानडे, दयासागर बौद्ध प्रमुख अतिथी होते.जगप्रसिद्ध महाबोधी महाविहाराला ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यघटनेतील अनुच्छेद २५(२) मध्ये दुरुस्ती करून स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करावा लागेल. त्याकरिता आयोजित आंदोलन बेमुदत स्वरुपाचे आहे. बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा लागू होतपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. हा आरपारचा लढा आहे असे खैरे यांनी सांगितले.अन्य मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. परिषदेत १५ राज्यातील दोन हजारावर बौद्ध प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी अतिथींचे स्वागत केले. प्रा. अशोक वानखेडे यांनी प्रास्ताविक तर, हंसराज शेंडे व प्रा. प्रमोद मेश्राम यांनी संचालन केले. सुनील जांभुळकर यांनी आभार मानले. धनराज धोपटे, बबनराव लव्हात्रे, प्रदीप फुलझेले, विशाल गोंडाणे, चंद्रमणी सहारे, चांगो बोरकर, मनोहर हेंडवे, सुरेश गोटेकर, वर्षा वाघमारे, मधुकर मेश्राम आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.