शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कामगार चळवळीचा केंद्रबिंदूच हरवतोय!

By admin | Updated: May 2, 2017 02:00 IST

मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे.

बैद्यनाथ चौकातील कामगार भवनाची व्यथा : मिल कामगार चळवळीचा ऐतिहासिक वारसामंगेश व्यवहारे नागपूर मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे. कधी काळी येथे असलेली कामगारांची लगबग आता हरविली आहे. मिल कामगारांच्या मेहनतीतून उभ्या झालेल्या या वास्तूमध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे कार्यालय आपल्या भूतकाळातील आठवणी जपून आहे. आज या वास्तूच्या मेंटेनन्सचाही वांदा येत असल्याने यातील काही खोल्या किरायाने दिल्या आहेत. काळाच्या ओघात जशी मिल कामगारांची चळवळ लोप पावली तशीच ही वास्तू लोप पावण्याच्या मार्गावर आहे. कधी काळी देशातील सर्वात मोठा कामगारवर्ग हा मिलमध्ये काम करणारा होता. त्याकाळी मिल कामगारांच्या चळवळी सरकारवर दबाव निर्माण करतील एवढ्या प्रभावी असायच्या. नागपुरात असणाऱ्या तीन मिलमध्ये शहरातील १९५० ते ६० च्या दशकात २५ ते ३० हजार कामगार काम करायचे. त्यावेळी मिल कामगारांच्या चळवळी अतिशय प्रभावी होत्या. माजी मंत्री नरेंद्र तिडके, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, मधुकरराव किंमतकर हे मिल कामगारांच्या चळवळीतून पुढे आलेली नावे आहेत. या मिल कामगारांना संघटित ठेवणारा राष्ट्रीय मिल मजदूर संघ हे प्रभावी संघटन होते. या संघटनेने मिल कामगारांसाठी स्वत:ची वास्तू असावी, या उद्देशातून कामगार भवनाची निर्मिती केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बैद्यनाथ चौकात या वास्तूची निर्मिती झाली. १९६८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, मिल प्रशासनाशी लढा, कामगारांचे प्रशिक्षण, मिल कामगारांच्या संदर्भात शासनाशी पत्रव्यवहार येथून चालायचा. मिल कामगारांच्या हक्काची ही वास्तू होती. त्या काळी सदासर्वदा येथे कामगारांची लगबग असायची. सभासदांच्या वार्षिक वर्गणीवर या वास्तूचे मेंटेनन्स व्हायचे. राष्ट्रीय सण, राष्ट्रपुरुषांचे पुण्यतिथी, कामगार दिवस हे सोहळे भव्यतेने साजरे व्हायचे. कामगार चळवळीतील मोठमोठ्या नेत्यांचे त्याकाळी येथे वास्तव्य असायचे. १९८६ मध्ये एम्प्रेस मिल बंद पडल्यानंतर सरकारशी, प्रशासनाशी लढा येथूनच उभारला होता. कालांतराने शासनाच्या धोरणामुळे शहरातील एम्प्रेस, मॉडेल मिल व नागपूर सहकारी सूतगिरणी बंद पडली. कामगार बेरोजगार झाले. हळूहळू कामगारांच्या संघर्षाची ऊर्जा कमी होत गेली आणि या कामगार भवनाचीही लगबग झाली. आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ या इमारतीची देखभाल करीत आहे. संघाचे कार्यालय येथे आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे जिल्हा कार्यालय येथे आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांच्या न्यायालयीन प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. बंद पडलेल्या सूतगिरणीतील कामगारांच्या मागणीवर शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु या भवनाची भव्यता आज राहिलेली नाही. कधीकाळी कामगार दिनानिमित्त येथे अधिवेशने, संमेलने भरायची आज येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन औपचारिकता पार पाडावी लागत आहे. (प्रतिनिधी)शासनाची कामगारविरोधी धोरणे, कामगार नेत्यांची स्वहिताची वृत्ती यामुळे कामगार चळवळीची ऐतिहासिक वास्तू असलेल्या या भवनाचे ऐश्वर्य हरविले आहे. तुकाराम डेकाटे,महासचिव, राष्ट्रीय मिल मजदूर संघ