शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हवालदारावर हल्ला करणारा गजाआड

By admin | Updated: September 18, 2016 02:34 IST

वाहतूक शाखेच्या हवालदाराला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सूर्यकांत अरुण व्यास (वय २५) याला

लालगंजमध्ये सापडला आरोपी : रविवारी कोर्टात नेणारनागपूर : वाहतूक शाखेच्या हवालदाराला दगडाने ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सूर्यकांत अरुण व्यास (वय २५) याला गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी लालगंज परिसरात पकडले. त्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. दीक्षाभूमी चौकाजवळ, माता कचेरी परिसरात असलेल्या शासकीय वसाहतीत आरोपी राहतो. त्याच्या वडिलांना सेवेत असताना हे शासकीय निवासस्थान उपलब्ध झाले होते. तो खासगी वाहनचालक म्हणून काम करतो. त्याला दारूचे भारी व्यसन आहे. मोठ्या प्रमाणात दारू पिल्यानंतर शुक्रवारी रात्री ९.१५ वाजता तो ट्रीपल सीट दुचाकी चालविताना संत्रा मार्केट परिसरात पकडला गेला होता. वाहतूक शाखेचे (उत्तर विभाग) हवलदार प्रकाश रामकृष्ण बारंगे (वय ४६, रा. विश्वकर्मानगर, अजनी) आणि हवालदार मोहन रेवतकर या दोघांनी त्याला पकडले. त्याची वैद्यकीय तपासणी (ब्रीथ अ‍ॅनलायझर टेस्ट) करण्यासाठी त्याला हवलदार बारंगे यांनी दुचाकीवर बसवले. ते वाहतूक शाखेच्या उत्तर विभाग कार्यालयात जात होते. रस्त्यात आरोपी व्यासने बारंगेचा गळा आवळून त्यांना खाली पाडले आणि हेल्मेट तुटेपर्यंत मारले. त्यानंतर व्यासने बाजूचा दगड उचलून बारंगे यांचे डोके ठेचले. बारंगेंना गंभीर जखमी करून आरोपी पळून गेला. गणेशपेठचे ठाणेदार महेश चव्हाण यांनी याप्रकरणी आरोपी व्यासविरुद्ध प्राणघातक हल्ला अन् शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)सासऱ्याच्या दारासमोरच जेरबंदया घटनेमुळे पोलिसांची विविध पथके रात्रीपासूनच आरोपीचा शोध घेत होती. त्याच्या सर्वच नातेवाईकांच्या घराजवळ पोलीस बसून होते. रात्रभर लपत छपत फिरणारा आरोपी व्यास लालगंजमधील त्याच्या सासऱ्याच्या घरी शनिवारी दुपारी १ च्या सुमारास येतना दिसला. पोलिसांनी सासऱ्याच्या दारासमोरच व्यासवर झडप घातली. त्यानंतर त्याला गणेशपेठ ठाण्यात आणण्यात आले. सायंकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी व्यासविरुद्ध २०१२ मध्ये ड्रंक न ड्राईव्हची कारवाई केली होती. त्यावेळी त्याच्याकडे शस्त्र सापडल्याने हत्यार कायद्यानुसारही गुन्हा दाखल केला होता, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. बारंगेची प्रकृती धोक्याबाहेरजखनी बारंगेवर रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बारंगे यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.