मोवाड : मोवाड येथे आलेल्या महाप्रलयाला शुक्रवारी ३० वर्षे पूर्ण झाली. या प्रलयात २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोवाडवासांनी स्मृतिस्थळी जुन्या आठवणींना उजाळा देत मृत्युमुखी पडलेल्या २०४ जणांना भावुक होत श्रद्धांजली अर्पण केली.
३० वर्षांपूर्वी ‘मोवाड सोन्याचं कवाड’ म्हणून ओळखले जात होते. मात्र महाप्रलयानंतर सारे भकास झाले. अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले. मोवाडचे पुनर्वसन झाले मात्र वैभव हरविले आहे. श्रद्धांजली कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख राजू हरणे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उबरकर, तहसीलदार डी.जी. जाधव , प्रशासकीय अधिकारी नितीन तपकीर, युवासेनेचे काटोल विधानसभा समन्वयक ललित खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, शिवसेना शहर प्रमुख हिराचंद कडू, रवी माळोदे, रवी वैद्य, इस्माईल बारूदवाले, पुरुषोत्तम बागडे, वासुदेव बनाईत, फिरोज दिवाण, दिनेश पांडे, संदीप पालीवाल, भाजप नेते मनोज कोरडे, संजय कामडे, ज्ञानेश्वर दारोकर, राजेंद्र चाळीसगाकर, केशव कळंबे, दत्तात्रय चाटी आदी याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यान, ३० जुलै हा काळा दिवस पाळत शहरातील व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवल्या होत्या.
पोलीस चौकी येथेही श्रद्धांजली
३० जुलै १९९१ च्या महाप्रलयात पोलीस शिपाई समाधान इंगळे व वामन मेंढे यांना जलसमाधी मिळाली होती. त्यांना मोवाड पोलीस चौकीतील स्मारकावर पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, उपनिरीक्षक कोलते, मिलिंद राठोड, साहेबराव मसराम, गजानन शेंडे, नीलेश खेरडे उपस्थित होते.