शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबाग खून प्रकरण ; सहा जण निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 02:43 IST

बहुचर्चित मोतीबाग फुटबॉल ग्राऊंड येथील खून खटल्यातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या न्यायालयाने ....

नागपूर : बहुचर्चित मोतीबाग फुटबॉल ग्राऊंड येथील खून खटल्यातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या न्यायालयाने सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. रवी मनोहर पाटील (३३) रा. इंदोरा मॉडेल टाऊन , अभिजित चंद्रशेखर मेश्राम (४१) रा. मोहननगर खलासी लाईन, कामेश गोपाल मुदलियार (३७) रा. मिसाळ ले-आऊट, अमोल ऊर्फ पिंटू राजू मून (२८) रा. इंदोरा, दिनेश अर्जुन चंद्रिकापुरे (३१) आणि अजय धनसिंग उईके (२७) दोन्ही रा. इंदोरा, अशी आरोपींची नावे आहेत. मयूर कैलाश जांभूळकर, असे मृताचे नाव होते. तो ‘चेन स्नॅचर’ होता आणि इंदोरा येथीलच रहिवासी होता. सरकार पक्षानुसार मृत मयूर आणि रवी पाटील यांचे आपसांत वैमनस्य होते. अनेकदा रवी पाटीलने त्याला मारहाण केली होती. इमारतीच्या छतावरून फेकण्याचा प्रयत्नही केला होता. १ जानेवारी २०१४ रोजी सकाळी मोतीबाग फुटबॉल मैदानातील विहिरीत मयूर जांभूळकरचा मृतदेह आढळून आला. शरीरावर अनेक ठिकाणी धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या जखमा झाल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२,२०१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृताची आई निर्मला जांभुळकर यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आणि मृतासोबतच्या जुन्या वैमनस्यावरून आरोपी रवी पाटीलसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी तपास करून भादंविच्या ३०२, २०१, १४३,१४७, १४८, १४९, १२० ब कलमांतर्गत आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बचाव पक्षाचा असा युक्तिवाद होता की, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हे प्रकरण होते. परंतु सरकार पक्ष पुराव्यांची साखळी जुळवण्यात अपयशी ठरला. मृत मयूरविरुद्ध चेनस्नॅचिंगचे बरेच गुन्हे होते. त्याच्या पोटात खूप दारूही सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी मयूरच्या सहआरोपींची चौकशी करायला हवी होती. आधी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर पुरावे जुळवण्यात आले असे वाटते. न्यायालयाने संपूर्ण परिस्थितीचा विचार करून सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. रमेश रावलानी आणि अ‍ॅड व्ही. एन. बन्सोड यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)