शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात नराधमाने लादले अल्पवयीन मुलीवर मातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार करून एका नराधमाने तिला गर्भवती बनविले. विशेष म्हणजे, पोटात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून अत्याचार करून एका नराधमाने तिला गर्भवती बनविले. विशेष म्हणजे, पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले अन् काही वेळेतच मुलीने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यामुळे त्या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.

पीडित मुलगी केवळ १५ वर्षांची आहे. ती दहावीपर्यंत शिकली असून, तिच्या घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. मुलीला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सोमवारी तिच्या पोटात कळा आल्याने तीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर आईवडिलांनी तिला मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मुलीचे वय अवघे १५ वर्षे असल्याचे कुटुंबीयांनी सांगताच डॉक्टर चक्रावले. ती गर्भवती असून कोणत्याही दिवशी तिची प्रसूती होऊ शकते, असे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे कुटुंबीयही हादरले. दरम्यान, तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे मेयो रुग्णालयातून यशोधरानगर पोलिसांना सोमवारी सायंकाळी माहिती कळविण्यात आली. ठाणेदार संजय जाधव यांनी पीएसआय शेख यांच्यासह तत्काळ मेयो इस्पितळ गाठले. १५ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणारा नराधम कोण, या संबंधाने त्यांनी मुलीच्या आईवडिलांकडे चाैकशी केली. मात्र, त्यांनी मुलीवर अत्याचार करणारा कोण, ते माहीत नसल्याचे सांगितले.

मुलीने जन्माला घातलेल्या बाळाची प्रकृती चांगली असली तरी मुलीची प्रकृती जबाब नोंदविण्याएवढी चांगली नसल्याचे सांगून डॉक्टरांनी तूर्त तिला विचारपूस करता येणार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे आरोपी कोण, ते उघड झाले नाही.

---

आरोपीचे नाव अंधारात

कर्णोपकर्णी हे वृत्त सर्वत्र चर्चेला आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मुलीची प्रकृती चांगली होण्यासाठी किमान दोन दिवस लागतील असे यशोधरानगर पोलिसांना डॉक्टरांनी सांगितले. तिच्याकडूनच आरोपीचे नाव उजेडात येणार आहे. तूर्त पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार, बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

----