शाळेचा पहिला दिवस.....कायम स्मरणात राहणारा. मुलांच्या अन् पालकांच्याही. काल-परवापर्यंत दुडूदुडू धावणारे, बोबडे बोल बोलणारे लाडके कोकरू असे एकदम शाळेच्या गणवेशात पुढे उभे ठाकते तेव्हा आनंदाने कडा पाणवतात पालकांच्या. आई अशी लाडाने मुका घेते...वडील मुलाला व त्याच्या मित्रांनाही सोबत घेतात गाडीवर... शाळेत तर चक्क शिक्षकच फूल घेऊन दारात उभे असतात स्वागताला. परंतु मुलांचे रडणे काही केल्या थांबत नाही. मग हळूच एक चॉकलेट हातात पडते, कवितेच्या छान छान ओळी ऐकाव्याशा वाटतात, नवीन नवीन मित्र भेटतात. अशा धुंद वातावरणात मन रमले की दारात उभे असलेले बाबा कधी घरी गेले कळतच नाही.
आई वळली, मुलं रडली... दोस्त भेटताच धमाल झाली !
By admin | Updated: June 27, 2014 00:46 IST