शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सासूचा दात पाडला जामीनावर सुटला

By admin | Updated: February 28, 2016 03:07 IST

सासूला जबर मारहाण करून चक्क दात पाडला. साळीचाही विनयभंग केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची गंभीर दखल न घेतल्याने न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नागपूर : सासूला जबर मारहाण करून चक्क दात पाडला. साळीचाही विनयभंग केला. पोलिसांनी या दोन्ही घटनांची गंभीर दखल न घेतल्याने न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारकापुरी येथे घडली होती. प्रवीण तंत्रपाळे, असे आरोपीचे नाव आहे. तो द्वारकापुरी येथे राहतो. याच भागात राहणारी एक दुर्दैवी महिला १ फेब्रुवारी रोजी आजारी मुलीला घेण्यासाठी तिच्या घरी गेली होती. मुलीला तिने आपल्या घरी नेऊन उपचार करून दोन दिवसानंतर तिला घरी पोहचवून दिले होते. सोबत तिने आपल्या मोठ्या मुलीला घेतले होते. प्रवीण हा तिचा जावई आहे. माझ्या पत्नीला का घेऊन गेले, अशी विचारणा करीत प्रवीण त्याचे अन्य नातेवाईक अमोल, श्यामराव आणि बेबी तंत्रपाळे यांनी या दोघांना मारहाण केली होती. प्रवीण याने सासूच्या तोंडावर ठोसा मारून तिचा एक दात पाडला होता. ती बेशुद्ध झाली होती. प्रवीणने चक्क आपल्या साळीचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर या महिलेच्या मुलाने पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करून घटनेची सूचना दिली होती. तब्बल आठ-दहा दिवसानंतर १२ फेब्रुवारी रोजी अजनी पोलिसांनी भादंविच्या ३५४, ३२५, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपी प्रवीण तंत्रपाळे याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताच त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या घटनेची त्वरित दखल न घेता उशिरा गुन्हा दाखल करून संशय निर्माण केल्याने आरोपीला जामीन मंजूर झाला. (प्रतिनिधी)