शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आई, वडील व मुलाने हरविले कोरोनाला  : मेडिकलमधून मिळाली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 20:05 IST

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मंगळवारी आणखी तीन कोरोनाबाधितांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. आई, वडील व मुलाने कोरोनाला हरविले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, वडिलांना पक्षाघात झाला होता. त्या स्थितीतही त्यांनी कोरोनाशी लढा दिला. यात त्यांना मेडिकलच्या डॉक्टरांची मोठी मदत झाली.नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मंगळवारी ५६ झाली. गेल्या तीन दिवसांत २७ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. असे असताना तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काहीसा दिलासाही मिळाला आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे व औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमख डॉ. राजेश गोसावी यांनी ‘कोविड-१९’ वॉर्डात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. रुग्णालयातून सुटी झालेल्या ४५ वर्षीय वडिलांचा संपर्क त्याच्या कोरोनाबाधित भावाकडून झाला होता. त्याचा भाऊ बाधित रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. वडिलांचे नमुने २९ मार्च रोजी पॉझिटिव्ह आले. यामुळे त्यांची ४४ वर्षीय पत्नी व १४ वर्षीय मुलाचे नमुने तपासले असता ३० मार्च रोजी दोघेही पॉझिटिव्ह आले. या तिघांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. भरतीच्या सातव्या दिवशी व १४ दिवसांनंतर २४ तासांच्या कालावधीत तपासलेले तिन्ही नमुने निगेटिव्ह आले. यामुळे तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या दरम्यान, आई-वडील व मुलाने त्यांना सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या रुग्णसेवेची प्रशंसा केली. डॉक्टरांचे उपचार, त्यांनी दिलेले हिमतीचे बळ आणि आपल्याला बरे व्हायचे आहे, ही सकारात्मक वृत्ती ठेवल्याने आजारातून बरे झालो, असेही त्यांचे म्हणणे होते. तिघांना रुग्णालातून घरी नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आले होते. तिघेही कोरोनामुक्त झाले असले तरी पुढील १४ दिवस त्यांना घरीच राहावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर