शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

मोस्ट वॉन्टेड ढोलवाला गजाआड

By admin | Updated: May 20, 2015 02:59 IST

डोबीनगर, अन्सारनगर, मोमिनपुऱ्यात प्रचंड दहशत असलेल्या ईप्पा गँगचा सदस्य ...

नागपूर : डोबीनगर, अन्सारनगर, मोमिनपुऱ्यात प्रचंड दहशत असलेल्या ईप्पा गँगचा सदस्य तसेच खून आणि लुटमारीच्या अनेक गुन्ह्यातील वॉन्टेड गुन्हेगार रमजान शहा ऊर्फ ढोलवाला रऊफ शहा (वय २५, रा. मोमीनपुरा) याच्या गुन्हेशाखेच्या पथकाने अकोल्यात जाऊन मुसक्या बांधल्या. तो तीन वर्षांपासून पोलिसांना वॉन्टेड होता. आरोपी ढोलवाला हा कुख्यात ईप्पा टोळीतील खतरनाक गुन्हेगार आहे. २०११ मध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात त्याने त्याच्या साथीदारांसह मोहम्मद आसिफ ऊर्फ गुड्डू अब्दुल जलिल याच्या डोक्यात गोळी झाडून त्याची निर्घृण हत्या केली होती. गुड्डूच्या एका मित्रावरही प्राणघातक हल्ला चढवला होता. तहसील ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या घटनेपासून आरोपी फरार होता. त्यानंतर २०१४ मध्ये स्मृती टॉकीज समोरच्या पेट्रोल पंपावर एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध जरीपटका, पाचपावली, लकडगंज ठाण्यातही जबरी चोरी, प्राणघातक हल्ल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. दरम्यान, तो माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुम (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथे दडून बसल्याची माहिती गुन्हेशाखेला कळाली. त्यावरून पोलीस आयुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर ढोले, पीएसआय अब्दुल वहाब, हवालदार राजेश ठाकूर, शिपायी दया, मंजितसिंग, प्रीतम यांनी कुरुम गाठले. तेथे शोधाशोध करून पोलिसांनी सोमवारी दुपारी कुख्यात ढोलवालाच्या मुसक्या बांधल्या. त्याला मंगळवारी नागपुरात आणले. (प्रतिनिधी) राजा गौस टोळीशी संबंधआरोपी ढोलवाला हा खतरनाक राजा गौस टोळीचाही सदस्य आहे, असे पोलीस सांगतात. राजा गौस साठी त्याने कुठेकुठे गुन्हे केले. तसेच अनेक गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची माहिती उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.