शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

महाराष्ट्रात सर्वाधिक जीवनदाते

By admin | Updated: May 16, 2014 00:46 IST

रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

नागपूर : रक्तदान हेच जीवनदान म्हटल्या जाते. हे पुण्यकर्म करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या चार वर्षांंपासून गरजेपेक्षा रक्ताचे संकलन दीड ते दोन लाख युनिटने जास्त होत आहे.

वाढलेले आजार, अपघातामुळे रुग्णांना, जखमींना रुक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल, ब्लड कॅन्सरचा आजार झालेल्या रुग्णांना तर नियमित रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात रक्त संकलन सर्वाधिक जास्त होत असेल तर महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. राज्याला दरवर्षी १0 ते १२ लाख युनिट रक्ताची गरज भासते, असे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचा अहवाल आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी शासकीय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, रक्तपेढय़ा रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करतात. राज्यात जवळपास ३00 च्यावर रक्तपेढय़ा आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठय़ा शहरात रक्ताची गरज अधिक असते. विशेष म्हणजे ३५ दिवसांत संकलन केलेल्या रक्ताचा वापर करावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रक्तातील वेगवेगळे घटक काढून वापरात आणले जातात.

गरजेपेक्षा जास्त रक्त संकलन होणे महाराष्ट्रासाठी भूषणावह असले तरी, खाजगी रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रक्ताचा व्यवसाय होत आहे. यात गरीब मात्र भरडल्या जात आहे. त्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला कुणीच पुढे सरसावत नाही. परिणामी, रक्ताअभावी अनेकांचे जीव जात आहेत. रक्ताच्या उपलब्धतेसाठी आता स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)