शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

अभियांत्रिकीमध्ये ‘पीएचडी’साठी सर्वाधिक इच्छुक

By admin | Updated: August 12, 2016 02:44 IST

साधारणत: ‘पीएचडी’साठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे.

नागपूर विद्यापीठ : ‘पेट’ साठी सव्वाचार हजारांहून अधिक अर्ज दाखल नागपूर : साधारणत: ‘पीएचडी’साठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकी विद्याशाखेत ‘पीएचडी’ करण्यासाठी सर्वात जास्त उमेदवार इच्छुक आहेत. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ परीक्षेचे दुहेरी आव्हान असूनदेखील सव्वाचार हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सुमारे २८ टक्के उमेदवार एकट्या अभियांत्रिकी शाखेचे आहेत. नागपूर विद्यापीठातर्फे यंदा घेण्यात येणाऱ्या ‘पेट’ परीक्षेचे उमेदवारांसमोर दुहेरी आव्हान आहे. नोंदणीला पात्र होण्यासाठी २ पेपर ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण करावे लागणार आहेत. शिवाय विद्यापीठाने ‘पीएचडी’साठी इतर नियमदेखील कडक केले आहेत. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी अर्ज येतील, असे अधिकाऱ्यांना वाटत होते. सुरुवातीला अर्जांची संख्यादेखील कमी होती. ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्याची अखेरची तारीख १० आॅगस्ट ही होती. विद्यापीठाकडे ४ हजार २८५ अर्ज आले. यापैकी ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शुल्क भरून अर्ज भरले आहेत. नागपूर विद्यापीठाची ‘पेट’ ही ६६ विविध विषयांसाठी घेण्यात येणार आहे. यात सर्वात जास्त उमेदवार हे अभियांत्रिकी शाखेतील आहेत. या शाखेतील १ हजार ३२० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. सर्वात कमी ४५ अर्ज हे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून आले आहेत. (प्रतिनिधी) व्यवसाय व्यवस्थापनात ३३७ तर अरेबिकमध्ये एकाचा अर्ज नागपूर विद्यापीठाअंतर्गत वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या व्यवसाय व्यवस्थापन विषयात ‘पेट’ देण्यासाठी ३३७ जणांनी अर्ज भरले आहेत. ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीमध्ये ३०२ तर संगणक विज्ञान अभियांत्रिकीत २९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विज्ञान शाखेतून रसायनशास्त्र विषयातून सर्वाधिक १७७ अर्ज आले आहेत. तर कला विद्याशाखेतील इंग्रजी विषयात १६२ अर्ज दाखल झाले आहेत. या विद्याशाखेतील अरेबिक विषयात केवळ एकाचाच अर्ज आला आहे.