शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:11 IST

सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..?

ठळक मुद्देजमाअत ए इस्लामी हिंदचा स्तुत्य उपक्रमजनमानसातील दुरावा कमी करण्यासाठीचा प्रयत्न

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..? किंवा मस्जिदमध्ये काही विपरित होत असतं अशी आशंका ज्यांच्या मनात भेडसावत असते त्यांना थेट मस्जिदमध्ये जाऊन पहायला व विचारायला संधी मिळाली तर?...हो, अशी एक संधी महाराष्ट्रातील एकदोन नव्हे तर तब्बल १०० मशिदींमध्ये देण्यात येते आहे. तिचे नाव आहे, मस्जिद परिचय.अलिकडेच नागपुरातील सर्वात जुन्या व मोठ्या अशा जामे मस्जिदमध्ये हा मस्जिद परिचयचा कार्यक्रम घेण्यात आला. यात शहरातील नागरिकांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमंत्रण देण्यात आले होते. यात कोणत्याही जातीधर्माचा नागरिक सहभागी होऊ शकतो. (सध्या यात स्त्रियांना प्रवेश नाही. मात्र जसं मक्का मदिना येथे स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था आहे, तशी पुढेमागे होईल अशा आशावाद आहे.) मस्जिद परिचयमध्ये नमाज पढण्याची संपूर्ण रीत कशी आहे याची माहिती दिली जाते. अजानचे स्वर कसे असतात, त्याचा काय अर्थ होतो याचीही माहिती दिली जाते. सर्व माहिती दिल्यानंतर उपस्थित नागरिकांना प्रश्न विचारण्याची संधी असते. आपल्या मनात असलेले प्रश्न ते विचारू शकतात व आपले समाधान करू शकतात.गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम महाराष्ट्रातील मशिदींमध्ये राबविला जातो आहे. नागपुरात सध्या पाच मशिदींमध्ये तो सुरू आहे आणि अजून दोनमध्ये तो होऊ घातलाय.काय आहे उद्देश या उपक्रमामागचा?जमाअत ए इस्लामी हिंदचे नागपूर सेंट्रलचे अध्यक्ष अशरफ बेलीन यांच्यामते, आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक आहेत. मात्र आपले परस्परांसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. दुरावा आहे. गैरसमज आहेत. असं पसरवलं जातंय की, मदरसामध्ये चुकीचे शिक्षण दिले जाते किंवा मशिदीत गैरप्रकार होत असतात. या शंका, हे गैरसमज दूर व्हायला हवेत. त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू झाला. त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. यात आम्ही नागरिकांना आमंत्रण देतो. बऱ्याच जणांना वाटतं की अजानमध्ये अल्लाला आवाज दिला जात असतो. पण तसं नाही. यात सर्व नागरिकांना पाचारण केलं जात असतं. जे नागरिक येतात त्यांना आम्ही मस्जिद व मदरसे दाखवतो. त्यांना आम्हाला जवळून समजून घेण्याची ही संधी असते. समाजातील जातीय-धार्मिक दुरावा कमी होण्यासाठीचे हे पाऊल आहे.कसा आहे प्रतिसाद?हा उपक्रम सुरू होऊन जेमतेम वर्षभराचाच कालावधी होतोय. या काळात बऱ्याच नागरिकांनी यात सहभाग घेतला. मस्जिदीत जाऊन पाहिले, ऐकले, विचारले व जाणून घेतले. त्यांचे समाधान झाले आहे. हा उपक्रम अजून व्यापक होण्याची गरज आहे. अनेकजण आता फोन करून विचारतात की केव्हा आहे आता हा कार्यक्रम, आम्हाला यायचे आहे.आपण प्रतिज्ञेत म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेला मूर्त रूप देण्याचा जमाअत ए इस्लामी हिंदने सुरू केलेला हा प्रयत्न हळूहळू रुजतो आहे. येणाऱ्या पिढीला त्याची महती निश्चितच जाणवेल असा विश्वास अशरफ बेलीन पुढे व्यक्त करतात. 

टॅग्स :Mosqueमशिद