शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

मोहनवीणेच्या स्वरांनी सजलेली सुरेल पहाट

By admin | Updated: June 9, 2014 01:22 IST

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ब्रह्मनाद या मंगलमयी सुरेल पहाट संगीताच्या साक्षीने करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात आज सुप्रसिद्ध मोहनवीणावादक पंडित विश्‍वमोहन भट

ब्रह्मनाद : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने ब्रह्मनाद या मंगलमयी सुरेल पहाट संगीताच्या साक्षीने करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला  आहे. या उपक्रमात आज सुप्रसिद्ध मोहनवीणावादक पंडित विश्‍वमोहन भट यांच्या वादनाचे आयोजन करण्यात आले. सकाळची प्रसन्न वेळ आणि  पंडितजींच्या मोहनवीणेने छेडलेल्या सुरेल स्वरांनी नागपूरकरांचा रविवार सुरेल केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ६ वाजता विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यांनी पं. विश्‍वमोहन भट आणि महाराष्ट्र  गौरवप्राप्त अरविंदकुमार यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्र संचालक डॉ. पीयूष कुमार, वेकोलीचे मुख्य संचालक दिनेशचंद्र गर्ग, रमेश बोरकुटे आणि  शेफ विष्णू मनोहर प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राच्या निसर्गरम्य मोकळ्या परिसरात सकाळी ६ वाजता ब्रह्मनाद कार्यक्रमात पं. विश्‍वमोहन भट यांनी  मोहनवीणा छेडली आणि सारे वातावरण संगीताच्या जादुई स्वरांनी भारले गेले. त्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ नटभैरव रागाने केला. भैरवचे विविध प्रकार,  त्रिताल, सोळा मात्रा, बारा मात्रांच्या पुढे ताल पकडणे, मुर्की, खटका, सुजलाम सुफलाम मलयज शितलाम आदी हृदयस्पश्री स्वर त्यांनी मोहनवीणेतून  काढले. यात पक्ष्यांचे स्वर आणि माणसांच्या भावभावनांची अभिव्यक्ती त्यांनी स्वरांतून केली. झाला सादर करून त्यांनी रसिकांना जिंकले आणि  वादनाचा समारोप केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्‍वेता शेलगावकर यांनी केले. याप्रसंगी पं. विश्‍वमोहन भट म्हणाले, जगाच्या कानाकोपर्‍यात  संगीतप्रेमी आहेत. ही किमया केवळ संगीताच्या सात स्वरांची आहे. हे स्वरच जगाला एकत्रित आणू शकतात. ही शक्ती संगीतात आहे, असे ते म्हणाले.  (प्रतिनिधी)ला.ला..ला..ला.., आय लव्ह इंडियाअमेरिके च्या इरिक क्लॅप्टन गिटारवादनाचा महोत्सव आयोजित करतात. जगातील ५0 हजार लोकांमध्ये त्यांनी मलाही या महोत्सवासाठी आमंत्रण  दिले. मी तेथे गेलो. आपलही काही वेगळं अस्तित्व त्यांना दाखवावे म्हणून मी एक स्वर छेडला. ला.ला..ला..ला.., आय लव्ह इंडिया..अन् त्या ५0  हजार लोकांच्या ओठावर ही धून कायम राहिली. त्या लोकांनी सुरात सूर मिसळून या धूनचे कौतुक केले. यावेळी पंडितजींनी ती धूनही सादर केली.  रसिकांनीही त्यांना प्रतिसाद देत सामूहिक गायन केले.