शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडी घोटाळ्यात दीडशेहून अधिक संस्थांचे ‘कनेक्शन’, प्रत्येक संस्थेची सखोल चौकशी सुरू

By योगेश पांडे | Updated: May 27, 2025 23:45 IST

आतापर्यंत आढळले ६२९ बोगस आयडी : वंजारी, जामदार यांच्या चौकशीतून अनेकांची पोलखोल

योगेश पांडे नागपूर : संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात ‘एसआयटी’कडून वेगाने तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार तसेच नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या सखोल चौकशीतून या घोटाळ्यात आणखी अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत या घोटाळ्यात दीडशेहून अधिक शैक्षणिक संस्थांचे ‘कनेक्शन’ समोर आले आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती पूर्व विदर्भासोबतच इतर ठिकाणीदेखील आहे का याचा एसआयटीकडून तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एसआयटीने २०१० पासूनच्या शालार्थ आयडीसंदर्भात तपास केला. नागपूर जिल्ह्यात जवळपास अकराशे प्रस्ताव तयार झाले होते. मात्र त्यातील केवळ साडेतीनशेच शालार्थ आयडीचे प्रस्ताव पडताळणी समितीकडे गेले. त्यांची छाननी झाली व ते अधिकृत ठरले. आतापर्यंतच्या तपासात ६२९ शालार्थ आयडी बोगस असल्याचे आढळून आले आहे. जवळपास दीडशे शिक्षणसंस्थांच्या शिक्षकांचे हे आयडी होते. त्या संस्थांचीदेखील चौकशी सुरू झाली आहे.

आरोपींची संख्या आणखी वाढणार

दरम्यान, एसआयटीने वंजारी, जामदार यांच्यासोबतच लिपिक मंघामचीदेखील सविस्तर चौकशी केली. शालार्थ आयडी तयार करणे, शासकीय नियुक्ती मिळणे व वेतन काढणे अशी ही प्रक्रिया होती. शिक्षणाधिकाऱ्यांकडून उपसंचालक कार्यालय व तेथून पडताळणी समितीकडे प्रस्ताव जाणे अभिप्रेत होते. मात्र आतापर्यंत ६२९ शालार्थ आयडी हे प्रस्ताव समितीकडे न पाठविता थेट जारी झाल्याची बाब समोर आली आहे. यात उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसोबतच काही निरीक्षक, लिपिक, अधीक्षक यांचादेखील समावेश असल्याचे आढळले आहे. या सर्वांवर एसआयटीकडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.

नीलेश वाघमारे फरारच

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेला वेतन विभाग अधीक्षक नीलेश वाघमारे हा फरारच आहे. त्याचा एसआयटीकडून शोध घेण्यात येत आहे. त्याने अगोदर पोलिसांना गुंगारा दिला होता. तो गोव्यात लपल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याची बाब एसआयटीतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. त्याला लपण्यास मदत करणाऱ्यांवरदेखील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.