शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सफाईसाेबत तलावांची परिसंस्था सुधारणे अधिक गरजेचे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:09 IST

मेहा शर्मा नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. ...

मेहा शर्मा

नागपूर : पाेलीस लाईनच्या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला ५० लाखांची मदत केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिने ही ‘गुड न्यूज’च म्हणावी लागेल. आपल्या नैसर्गिक स्त्राेतांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, ही बाब महामारीमुळे लक्षात आली आहे. आपले तलावही त्याचाच भाग आहेत. मात्र तलावांची केवळ स्वच्छता करणे हा केवळ पहिला टप्पा आहे, त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते वरवर तलाव स्वच्छ करणे हे अल्प काळाचे नियाेजन आहे. तलावांचे खाेलीकरण करणे गरजेचे असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढण्यास मदत हाेईल. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक व पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांच्या मते तलावातील तण मुळासकट काढणे गरजेचे आहे. त्यांना मुळापासून उपटून फेकल्यास त्यांची पुन्हा वाढ हाेणार नाही. वरवर तन काढण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच पावसात त्याची तेवढच्याच झपाट्याने वाढ हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी तलावाचे पाणी पूर्ण खाली करून त्यातील तण पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. यामुळे तलावाचा तळभाग क्लियर हाेईल. पुनरुज्जीवनाच्या दीर्घकालीन परिणामासाठी दुसरा टप्पा म्हणजे तलावाचे खाेलीकरण करणे. साेनेगाव आणि सक्करदरा तलाव मार्च महिन्यात नैसर्गिकरित्या सुकलेले असतात. त्यावेळी त्यांचे खाेलीकरण करण्याची चांगली संधी महापालिका किंवा इतर यंत्रणेकडे असते.

पाेलीस लाईन तलावाबाबत बाेलताना, या तलावाचे काम सुरू असल्याने त्याची खाेली वाढविणे सहज साेपे हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल. सक्करदरा व साेनेगाव तलावाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली असल्याने त्यांचे पूर्णपणे खाेदकाम हाेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तिसरा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे तलावातील परिसंस्थेच्या संरक्षणासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तलावांना नेहमी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज असते. वातावरणातील हवा तलावाच्या वरच्या स्तरावर पाेहचते पण खाेलीपर्यंत पाेहचत नाही. तलावातील जलपर्णी वनस्पती व तन असलेले ऑक्सिजन शाेषून घेतात. त्यामुळे सहाजिकच तलावाचे ऑक्सिजन कमी हाेते. कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्यासाठी तलावामध्ये फाउंटेन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे तलावाचे तळाचे पाणी फव्वाऱ्यांद्वारे वर येईल व त्याचे थेंब वातावरणातील ऑक्सिजन शाेषून घेतील. तलावांसाठी ६ मिलिग्रॅम/लिटर ऑक्सिजनची गरज असते. मात्र नागपुरातील बहुतेक तलावांमध्ये हे प्रमाण ४.५ ते ५ मिलिग्रॅम/लिटर एवढे आहे. तणाच्या वाढीमुळे ते आणखी खाली येत असल्याचे चटर्जी यांनी सांगितले.

महापालिकेच्या मंगळवारी झाेनचे अभियंता केशव साेनाेने यांनी पाेलीस लाईन तलावासाठी केलेल्या याेजनेबाबत माहिती दिली. या तलावासाठी यापूर्वी काहीच झाले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्याच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे खाेलीकरण आणि फाउंटेन लावण्याचाही प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचे साेनाेने यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील काम महिनाभरात पूर्ण हाेण्याची माहिती त्यांनी दिली.