शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगीच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज

By admin | Updated: December 25, 2016 03:03 IST

शुभांगी शेषराव देशभ्रतार या तरुणीने मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या दुर्धर आजारावर मात केली आहे.

‘थायमोमा’ आजाराशी सुरू झुंज : दानदात्यांनी पुढे यावे नागपूर : शुभांगी शेषराव देशभ्रतार या तरुणीने मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या दुर्धर आजारावर मात केली आहे. शासकीय मेडिकलमधील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि शहरातील दानदात्यांनी केलेली आर्थिक मदत तिच्या उपचारात मोलाची ठरली. मात्र ‘थायमोमा’ या आजाराशी सुरू असलेली तिची झुंज अद्याप संपलेली नाही. आॅपरेशन केल्यानंतरच ती पूर्णपणे बरी होऊ शकेल. मात्र यात तिच्या उपचारासाठी आणखी मदतीची गरज आहे. तेव्हा संवेदनशील समाजाने तिच्या उपचारासाठी आणखी मदत करावी असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. शुभांगीला एकाच वेळी मॅस्थेनीया ग्रॅव्हीस आणि थायमोमा या दोन दुर्धर आजारांनी ग्रासले होते. त्यावेळी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले. मॅस्थेनीया ग्रॅव्हीस या आजारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन अमेरिकेहून मागवावे लागत होते. मात्र आर्थिक परिस्थिती या महागड्या उपचारासाठी परवडणारी नसल्याने शुभांगीचे कुटुंब हतबल झाले होते. अशावेळी लोकमतने तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले आणि या हाकेला साद देत शहरातील संवेदनशील नागरिकांनी अनेक प्रकारे तिच्या कुटुंबीयांची मदत केली. या मदतीमुळे आवश्यक इंजेक्शन आणता आले व या मॅस्थेनीया आजारावर यशस्वी उपचारही झाले. एका आजारावर तिने मात केली असली तरी थायमोमा या आजाराचा धोका अद्याप कायम आहे. शुभांगी सध्या घरी असून तिच्यावर झेनीथ हॉस्पीटलच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. हा आजार बरा होण्यासाठी आॅपरेशनशिवाय पर्याय नसून डॉक्टरांनी लेप्रोस्कोपी आॅपरेशन करण्याची सूचना करीत यासाठी किमान ७० हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. औषधी आणि इतर खर्च मिळून एक लाख रुपये लागतील असा अंदाज आहे. आर्थिक संकटामुळे कुटुंबासमोर तिच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आॅपरेशन झाले नाही तर पुन्हा मॅस्थेनीयाचाही धोका संभवणार असल्याची भीती डॉक्टरांनी वर्तविली आहे. डॉक्टरांनी १५ दिवसापूर्वी यासाठी सुचविले होते. आधीच उशीर झाला असल्याने त्वरित मदत मिळाल्यास तिच्यावर उपचार सुरू होऊ शकतील. तेव्हापासून पैशांसाठी कुटुंबीयांची वणवण सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री सहायता निधीतून ४० हजार रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम लवकर मिळाल्यास आॅपरेशनची तयारी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर केवळ ६० हजार रुपयांची गरज पडेल. तेव्हा समाजातील संवेदनशील नागरिकांनीही थोडीशी मदत करून शुभांगीला या जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यास मदत करावी असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. शुभांगीच्या उपचारात मदत करण्यासाठी ७०३८४०८१९६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा किंवा बँक आॅफ इंडिया ठाणेगाव शाखेच्या ९७१४१०११००००५५३ या खात्यावर मदत राशी जमा करावी.(प्रतिनिधी)