शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षभरात उपराजधानीत ४४ हजारांहून अधिक वाहनधारकांनी तोडले ‘सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:04 IST

२०१८ मध्ये उपराजधानीत २८ हजार ७६७ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडले. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ हजारावर पोहचला आहे. यात ६० टक्के युवक-युवती असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाईहेल्मेटची ५९ हजार प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकातील वाहतूक सिग्नलवर पोलीस असतील तरच नियम पाळायचा, नाहीतर तोडायचा, असे धक्कादायक चित्र शहरातील आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१८ मध्ये झालेल्या १११७ अपघातात २३७ तर २०१९ मध्ये १००७ अपघातात २५० जणांचा मृत्यू झाला. असे असतानाही वाहतूक नियमांना बगल देण्याची प्रकरणे कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये ४४ हजार ७८ चालकांनी सिग्नल तोडले आहेत.वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्याचेही दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१८ मध्ये २८ हजार ७६७ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडले. तर २०१९ मध्ये हा आकडा ४४ हजारावर पोहचला आहे. यात ६० टक्के युवक-युवती असल्याचे समोर आले आहे. दोषींवरील कारवाईत शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळत असला तरी सिग्नल तोडणे हे प्राणांतिक अपघातासाठी कारणीभूत ठरते, याला गांभीर्याने घेत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी