शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

विद्वत्तेसोबत प्रॅक्टीसमध्ये नैतिकता आवश्यक : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:08 IST

प्रगत ज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानावर आपले भविष्य अवलंबून आहे. परंतु विद्वत्तेसोबत सामाजिक दायित्वही आवश्यक आहे. सामाजिक दायित्वाचे पालन करीत आपले कार्य केल्यास डॉक्टरांना पूर्ण समाधान मिळेल. आपल्या ‘प्रॅक्टीस’मध्ये नैतिकता दिसली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ चे थाटात उद्घाटन

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रगत ज्ञान, संशोधन व तंत्रज्ञानावर आपले भविष्य अवलंबून आहे. परंतु विद्वत्तेसोबत सामाजिक दायित्वही आवश्यक आहे. सामाजिक दायित्वाचे पालन करीत आपले कार्य केल्यास डॉक्टरांना पूर्ण समाधान मिळेल. आपल्या ‘प्रॅक्टीस’मध्ये नैतिकता दिसली पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.भारतीय बालरोग परिषद नागपूर शाखेच्या यजमानपदाखाली आयोजित ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ला गुरुवारपासून सुरुवात झाली. यात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, सीआयएपीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स, मावळते अध्यक्ष डॉ. अनुपम सचदेव, नवनिर्वाचित सचिव डॉ. रमेश कुमार, मावळते सचिव डॉ. बकुल पारेख, डॉ. दिगंत शास्त्री, परिषदेचे मुख्य आश्रयदाता डॉ. उदय बोधनकर, परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, सचिव डॉ. जयंत उपाध्ये प्रामुख्याने उपस्थित होते.अमेरिकेत दरवर्षी सुमारे दोन लाख ‘पेटेंट’ची नोंदणी होत असताना भारतात मात्र दोन ते अडीच हजारच ‘पेटेंट’ची नोंदणी होते. आपल्याकडे संशोधनाला घेऊन आवश्यक त्या सोई उपलब्ध होत नाही, अशी खंत व्यक्त करीत नितीन गडकरी म्हणाले, जगात दहा चांगल्या डॉक्टरांमध्ये चार भारतीय डॉक्टर आहेत. मात्र आपल्याकडे आजही सरकारी रुग्णालयांची स्थिती बिकट आहे. रुग्णालयाची स्थिती बळकट करण्यासाठी सामाजिक संस्थांनी सामोर येणे गरजेचे आहे. शिवाय भारतात आणखी नऊ लाख डॉक्टरांची आवश्यकता असून अधिक डॉक्टर तयार झाले पाहिजेत. त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती होणे गरजेचे आहे.१२ पंचतारांकित रुग्णालयनितीन गडकरी म्हणाले, जहाजबांधणी मंत्रालयाच्या जागेवर लवकरच १२ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हजार खाटांचे हे रुग्णालय पंचतारांकित असेल. यात ६० टक्के गरीब रुग्णांसाठी तर ४० टक्के व्यावसायिकतेसाठी वापर होईल.मावळते अध्यक्ष डॉ. सचदेव यांनी गेल्या वर्षभरात आयपीएद्वारे चालविलेल्या विविध कार्यक्र माची व उपक्र मांची माहिती दिली. ‘आयपॅन’ प्रकल्प ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संतोष सोअन्स म्हणाले की, तीन दशकांपूर्वी ‘आयपीए’शी जुळलो आणि आयुष्य बदलले. आता या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करताना कृतज्ञ असल्याचे सांगत भूतकाळ विसरून खिलाडूवृत्ती दाखविण्याचे आवाहन उपस्थित बालरोगतज्ज्ञांना केले. या प्रसंगी डॉ. उदय बोधनकर व डॉ. जयंत उपाध्ये यांनीही आपले विचार मांडले.प्रास्ताविक डॉ. वसंत खळतकर यांनी केले. नवनिर्वाचित सचिव रमेश कुमार यांनी अहवाल वाचन केले. मावळते अध्यक्ष डॉ. अनुपम सचदेव यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. डॉ. अनुपम सचदेव यांनी डॉ. सोअन्स यांना पदक प्रदान करीत संस्थेचा कार्यभार सोपविला. या प्रसंगी डॉ. विराज शिंगाडे व डॉ. प्रगती खळतकर निर्मित ‘पेडिकॉन थीमसाँग’ची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली.संचालन डॉ. राजीव मोहता यांनी तर आभार डॉ. प्रवीण पागे यांनी मानले. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, नागपूर शाखेला ‘नॅशनल अ‍ॅण्टिबायोटिक डे’, ‘टीनेज डे’, ‘डॉटर डे’ आणि ‘हेल्थी लाईफ स्टाईल डे’ या गटात चार पुरस्कारही प्रदान करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्र माची सांगता झाली.मंचावर डॉ. विरल कामदार, डॉ. अरुप रॉय, डॉ. हरमेश सिंग, डॉ. गुना सिंग, डॉ. केदार मालवटकर आदी उपस्थित होते. परिषदेच्या आयोजनासाठी परिषदेचे मीडिया प्रमुख डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सुचित बागडे, डॉ. गिरीश चरडे, यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीdoctorडॉक्टर