शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘मॉनिटरिंग’ करणारी यंत्रणाच बाधित : मनपात ३८५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 21:42 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे१७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करणारी व कोरोनाला आळा घालण्यासाठी मॉनिटरिंग करणारी महापालिकेची यंत्रणाच बांधित झाली आहे. मुख्यालय व झोन कार्यालयातील ३८५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आतापर्यंत १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मनपा मुख्यालयातील विभागप्रमुखही पॉझिटिव्ह आल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.मृतांमध्ये गांधीबाग झोनमधील सात व शिक्षण विभागातील पाच तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मनपातील अनेक विभागप्रमुख पॉझिटिव्ह आहेत. शिक्षण विभागातील ३६ अधिकारी, कर्मचारी पॉझिटिव्ह आले. सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख, अधीक्षक, उपायुक्त, आरोग्य विभागाचे प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यांचाही यात समावेश आहे. मनपात संसर्गाचा धोका वाढल्याने येथे येण्याचे नागरिकांनी टाळले पाहिजे. मुख्यालयातील प्रत्येक विभागात कमी-अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच दहाही झोनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. कोरोना बाधितांना उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या आरोग्य विभागात अनेकांना संसर्ग झाला आहे. यामुळे यंत्रणा प्रभावित झाली आहे.नियोजन नाही, नियमांकडेही दुर्लक्षमहापालिका मुख्यालय असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायम वर्दळ असते. बैठका, आंदोलन, यामुळे होणारी गर्दी, लिफ्टचा वापर यामुळे संसर्गाचा कायम धोका असतो. पॉझिटिव्ह कर्मचारी आढळून आलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना अन्य विभागात ये-जा करावी लागते. वित्त विभाग, सामान्य प्रशासन व घनकचरा व्यवस्थापन विभागात कायम गर्दी असते. काही विभागात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. फिजिकल डिस्टन्स ठेवणे शक्य होत नाही. नियोजनाचा अभाव संसर्ग वाढण्याला कारणीभूत ठरत आहे.कामाशिवाय येण्याचे टाळाशहरातील नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. मनपामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामाविना येण्याचे टाळावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. परंतु त्यानंतरही मनपा नागरिकांची ये-जा सुरूच आहे. झोनस्तरावर कामे झाली तर मुख्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी होण्याला मदत होईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या