शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

देवलापारची मोनिका सर्वात कमी वयाची, तर पेठ इस्माईलपूरचे माकोडे सर्वात ज्येष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

नरखेड/रामटेक/कुही : ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावागावांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. गावात कुणी कुणाला कसे हरविले, ...

नरखेड/रामटेक/कुही : ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता गावागावांचे लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. गावात कुणी कुणाला कसे हरविले, कोणता पॅनल वरचढ चढला, नातेवाइकांच्या लढती कशा झाल्या यावर अद्यापही चर्चांचे फड कायम आहेत. ते नवीन सरपंचपद आरूढ होईपर्यंत सुरूच राहातील. जिल्ह्यात निवडणूक झालेल्या १२९ ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी तरुणापासून ज्येष्ठापर्यंत सर्व वयाच्या उमेदवारांना कौल दिल्याचे दिसून येत आहे. यात रामटेक तालुक्यातील देवलापार ग्रामपंचायतमध्ये विजयी झालेली २२ वर्षीय मोनिका मधुकर पोवरे या सर्वात कमी वयाच्या उमेदवार, तर नरखेड तालुक्यातील पेठ इस्माईलपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ६६ वर्षीय सेवक संभाजी माकोडे हे सर्वात ज्येष्ठ वयाचे विजयी झालेले उमेदवार असल्याची माहिती ‘लोकमत’ चमून केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यात सावनेर तालुक्यातील जटामखोरा तर कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. कुही तालुक्यातील देवळी (कला) ग्रामपंचायतची निवडणूक मतदार यादीतील घोळामुळे रद्द करण्यात आली. यानुसार १२९ ग्रामपंचायतींमध्ये विविध वॉर्डांतून ११७४ उमेदवार विजयी झाले आहेत. यात तब्बल ६६९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. काही गावांचे निवडणूक निकाल सत्ताधारी पॅनलला धक्का देणारे, तर काही गावांचे निकाल सत्ताधारी पॅनलवर विश्वास दर्शविणारे लागले. त्यामुळे निवडून आलेल्यांत तरुण आणि ज्येष्ठ असे दोन्ही वर्गातील उमेदवारांना संधी मिळाली आहे.

कामठी तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. विविध वॉर्डांत ८६ उमेदवार विजयी झाले. यात टेमसना-परसोडी गटग्रामपंचायतीत २४ वर्षीय अनिकेत पुरुषोत्तम शहाणे सर्वात कमी वयाचे विजयी उमेदवार ठरले. पदवीधर असलेले अनिकेत महाविकास आघाडीकडून (काॅंग्रेस) रिंगणात होते. त्यांना २८७ मते मिळाली. त्यांनी भाजप समर्थित आदर्श ग्रामविकास आघाडीचे अरविंद केशवराव शहाणे यांचा पराभव केला. अनिकेत हे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पुरुषोत्तम शहाणे यांचे चिरंजीव आहेत.

कळमेश्वर तालुक्यात पाच ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. तीत ४७ उमेदवार विजयी झाले. यात ग्रामपंचायत सोनेगाव (पोही, खैरी) येथे काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीचे ५६ वर्षीय शुद्धोधन ग्यानदेव पाटील हे विजयी झालेले सर्वात ज्येष्ठ उमेदवार ठरले. त्यांनी २९१ मते मिळवित भाजपसमर्थित पॅनलच्या आरती गौतम शेंडे यांचा पराभव केला. पाटील हे सलग चौथ्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत. याच तालुक्यात बिनविरोध निवडणूक झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रामपंचायतचे २३ वर्षीय अक्षय सूर्यभान धुर्वे सर्वात कमी वयाचे सदस्य ठरले.

जिल्ह्यात सर्वाधिक २४ ग्रामपंचायतींची निवडणूक कुही तालुक्यात होती. येथे विविध वॉर्डांतून २०६ उमेदवार विजयी झाले आहेत. यात ११५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तालुक्यातील गट ग्रामपंचायत किन्ही येथे २३ वर्षीय मयूर दौलत ढेंगे हे सर्वात कमी वयाचे विजयी उमेदवार ठरले. त्यांनी २५५ मते मिळवित गावातील दोन दिग्गज उमेदवारांचा पराभव केला. यासोबतच पारडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेले ६१ वर्षीय नरेश अर्जुनप्रसाद शुक्ला हे ज्येष्ठ उमेदवार ठरले. त्यांनी काँग्रेस समर्थित गटाचे पुरुषोत्तम पोटे यांचा पराभव केला.

हिंगणा तालुक्यात पाच ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. तीत विविध वॉर्डांतून ५० उमेदवार विजयी झाले. यात आसोला ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले ६२ वर्षीय शेषराव गणपत नागमोते हे ज्येष्ठ सदस्य आहेत. नागमोते हे राष्ट्रवादी समर्थित गटाचे उमेदवार होते. त्यांनी शुभम भोयर यांचा पराभव केला.

रामटेक तालुक्यात नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. तीत विविध वॉर्डांतून ८१ सदस्य विजयी झाले. यात शिवनी ग्रामपंचायतमध्ये विजयी झालेले ६४ वर्षीय देवचंद शंकर इंगळे ज्येष्ठ उमेदवार ठरले. काँग्रेस समर्थित आघाडीचे इंगळे यांनी शिवसेना समर्थित पॅनलचे ओमप्रकाश लोंढे यांचा पराभव केला. नरखेड तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात विविध वॉर्डांतून १४७ उमेदवार विजयी झाले. यात पेठ इस्माईलपूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीचे २४ वर्षीय योगेश ज्ञानेश्वर नारनवरे विजयी झाले. योगेश यांनी १९५ मते घेत प्रतिस्पर्धी भाजप समर्थित गटाचे अरुण भजन नारनवरे यांचा पराभव केला.

मोनिकाचे वय केवळ २२

देवलापार ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेल्या २२ वर्षीय मोनिका मधुकर पोवरे या अनु.जाती प्रवर्गातील उमेदवार आहे. त्या बी.एस्सी. द्वितीय वर्षाला आहे. काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीच्या मोनिका यांनी गावातील अपक्ष आघाडीच्या कांता गौरीप्रसाद गजभिये यांचा ३५ मतांनी पराभव केला. मोनिका यांना २०१ मते मिळाली. मोनिका यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. केवळ जनसेवेच्या उद्देशाने त्यांनी ही निवडणूक लढविली.

६६ वर्षीय माकोडे पाचव्यांदा विजयी

नरखेड तालुक्यातील पेठ इस्माईलपूर ग्रामपंचायत विजयी झालेले ६६ वर्षीय सेवक संभाजी माकोडे पाचव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. गावकऱ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्याचे निराकरण करणे हे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. राजकारण न करता गावातील विकासकामाच्या बाबतीत सकारात्मक विचार करून सर्वांशी जुळवून घेतात. त्यामुळेच गावात लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे.

---

गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता, चांगल्या आरोग्य सुविधा, स्वच्छता अभियान आणि घराघरांत शुद्ध पिण्याची उपलब्धता करून देण्यास प्रथम प्राधान्य देणार

अनिकेत शहाणे (२२), ग्रामपंचायत सदस्य टेमसना-परसोडी

---

वनविभागात चौकीदार ते वनमजूर अशी कुही व भिवापूर तालुक्यात ३५ वर्षे नोकरी केली. गावात शासनाच्या अनेक योजना राबवून गावकऱ्यांसाठी काही चांगले करण्याचा मानस असल्याने निवडणुकीत उभा राहिलो.

नरेश शुक्ला (६१) ग्रामपंचायत सदस्य, पारडी

--

निवडून आलेले सदस्य - ११७४

ग्रामपंचायतींची झाली निवडणूक - १२९

निवडून आलेल्या महिला सदस्या - ६६९