शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मोनिका खून खटला:तीन मोबाईल्सचे कॉल डिटेल्स गुन्हे शाखेला पाठविले होते

By admin | Updated: May 7, 2014 02:53 IST

नागपूर शहर गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त सावंत यांच्या विनंती पत्रावरून आपण तीन मोबाईल्सचा कॉल डिटेल्स अहवाल पाठविला होता,

नोडल अधिकारी विद्वंस यांची साक्षनागपूर : नागपूर शहर गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त सावंत यांच्या विनंती पत्रावरून आपण तीन मोबाईल्सचा कॉल डिटेल्स अहवाल पाठविला होता, अशी साक्ष पुणे येथील टाटा टेलि सर्व्हिसेसचे नोडल अधिकारी मकरंद विद्वंस यांनी बहुचर्चित मोनिका किरणापुरे हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.डब्ल्यू. चांदवानी यांच्या न्यायालयात दिली. आपल्या सरतपासणीत साक्ष देताना त्यांनी सांगितले की, ग्राहकांचे येणारे कॉल, जाणारे कॉल, कॉलचा कालावधी, आयएमईआय क्रमांक आणि टॉवर लोकेशन आमच्या कंपनीच्या पुणे येथील सर्व्हरमध्ये आपोआप रेकॉर्ड होतात. या कामात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. सर्व्हरवरील माहिती घेण्यासाठी पासवर्डची गरज असते आणि तो फक्त आपणासच माहीत असतो. या अधिकार्‍याने पुढे असे सांगितले की, सावंत यांच्याकडून ७ एप्रिल २०११ रोजी ७२७६६३३८१४, ८१४९९७५३०३ आणि ८९८३९३९५८० या क्रमांकांच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स मागवण्यात आले होते. त्यानुसार आपण सर्व्हरवरून कस्टमर आयडी प्राप्त केला होता. हे मोबाईल अनुक्रमे रामभाऊ पंदर, नीलेश जयस्वाल आणि दीपक कावळे यांचे होते. आपण सर्व्हरवरून या सर्व मोबाईल्सचे कॉल डिटेल्स घेतले आणि त्याबाबतचा संपूर्ण अहवाल गुन्हेशाखेकडे पाठविला, असेही या अधिकार्‍याने सांगितले.