शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्याला पैसे परतीची हमी

By admin | Updated: December 31, 2016 03:04 IST

नागरिकांचा विशेषत: युवकांचा आॅनलाईन खरेदी करण्याकडे कल वाढला असून

अ. भा. ग्राहक पंचायत : ‘सायबर क्राईम’वर माने यांचे मार्गदर्शन नागपूर : नागरिकांचा विशेषत: युवकांचा आॅनलाईन खरेदी करण्याकडे कल वाढला असून फसवणुकींचेही प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आॅनलाईन खरेदीद्वारे फसवणूक झाली तर चोवीस तासाच्या आत सायबर क्राईम सेलकडे तक्रार दाखल केल्यास तक्रारकर्त्याला १०० टक्के संपूर्ण पैसे परत मिळू शकतात, असे आश्वासन सायबर क्राईमचे पोलीस उपनिरीक्षक विशाल माने यांनी येथे दिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे ‘सायबर क्राईम’ या विषयावर चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अश्पाक शेख, ग्राहक पंचायतचे माजी राष्ट्रीय सचिव अशोक त्रिवेदी आणि जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे उपस्थित होते. माने म्हणाले, क्रेडिट व डेबिट कार्डवर चीप नसेल तर ते कार्ड सुरक्षित नाही. त्यामुळे नागरिकांनी चीप असलेल्या कार्डची बँकांना मागणी करावी. फोनवर येणाऱ्या आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नये. सोशल मीडिया साईटवर वैयक्तिक माहिती देऊ नये. अश्पाक शेख म्हणाले, वाहतुकीचे नियम मोडू नये आणि हेल्मेट व सीटबेल्टशिवाय दुचाकी व चारचाकी वाहन चालवू नये.गजानन पांडे म्हणाले, क्रेडिट व डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून आॅनलाईन व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर क्राईम’ या विषयावर ग्राहक पंचायतच्या माध्यमातून विदर्भातील प्रत्येक तालुक्यात असे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. कार्यक्रमात विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख विनोद देशमुख, आयटी सेल प्रमुख नरेंद्र कुळकर्णी, नागपूर महिला प्रमुख तृप्ती आकांत, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद हरदास, श्रीपाद भट्टलवार, उदय दिवे, राजू पुसदेकर, ज्ञानेश्वर चौधरी, सतीश शर्मा, चंद्रशेखर ढवळे, अमर वंजारी, हरीश नायडू, संध्या पुनियानी, मुकेश गजभिये, अविनाश संगवाई, अ‍ॅड. गौरी चांद्रायण, ज्योती फडके, सुधांशू दाणी, अ‍ॅड. विलास भोसकर, डॉ. रवींद्र गुंडलवार, हरिभाऊ चौधरी, शामकांत पात्रीकर, किशोर मुटे, विलास देशपांडे, रवी सोर्इंदे, प्रकाश भुजाडे, जोगदंड आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)