शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

कच्च्या तेलाच्या सौद्यात असेही मिळतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:04 IST

जगभरातील सटोडिये कच्च्या तेलाच्या वायदे बाजारातील सौद्यामधून पैसे कमावतात. तसेच तेलवाहक जहाज (टँकर्स) भाड्याने घेऊनही प्रचंड पैसे कमावले जातात.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील सटोडिये कच्च्या तेलाच्या वायदे बाजारातील सौद्यामधून पैसे कमावतात. तसेच तेलवाहक जहाज (टँकर्स) भाड्याने घेऊनही प्रचंड पैसे कमावले जातात. हा गोरखधंदा कसा चालतो ते बघू या.जगभर रोज ११० लक्ष बॅरल तेल खपते आणि साधारणत: ४० ते ४१ दिवस पुरेल एवढी म्हणजे ४,५०० लक्ष बॅरल एवढीच साठवणूक क्षमता सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दररोज कमी/जास्त होणाऱ्या भावामधून पैसे कमविण्यासाठी सटोडिये अनेक क्लृप्त्या वापरत असतात. टँकर भाड्याने घेणे हा त्यातलाच सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.तेलवाहक टँकर क्षमतेनुसार चार प्रकारचे असतात. त्यात पॅनामॅक्स (६० ते ७५ हजार टन), सुवेझ मॅक्स (७५ हजार ते १.२० लाख टन), अ‍ॅफ्रामॅक्स (१.२० लाख ते २ लाख टन) व व्हेरी लार्ज क्रूड कॅरिअर्स अथवा व्हीएलसीसी (२ ते ३ लाख टन) यांचा समावेश असतो.सटोडिये तेलाच्या किमती कमी असताना तेल खरेदी करतात व ते टँकरमध्ये भरून घेतात. त्यानंतर तेल विक्रीची प्रक्रिया सुरू होते. सर्व सामाजिक, व्यापारी व राजकीय परिस्थिती बघून भाव किती वर जाईल, याचा अंदाज घेऊन सटोडिये एक टार्गेट भाव निश्चित करतात व तो मिळण्याची वाट पाहत बसतात. बरेचदा तेलवाहक जहाज संभाव्य ग्राहक ज्या देशात असेल त्याच्याजवळच्या समुद्रात उभे करून वाट बघितली जाते. जहाज बंदरात नेले जात नाही, कारण त्याचे पैसे द्यावे लागतात. एकदा ग्राहकाने तेलाचा भाव मान्य केला की मग जहाज बंदरात आणून डिलेव्हरी दिली जाते व पैसे घेतले जातात. हल्ली हा प्रकार डिजिटल पद्धतीने चालतो.या सर्व प्रकारात सटोडियाला फक्त जहाजाचे भाडे द्यावे लागते. कधी कधी भाव वाढण्याची वाट दोन-दोन महिने बघितली जाते. सटोडियांना ते परवडणारे असते. कारण तेलवाहक जहाजाची क्षमता लाखो टनाची असल्याने कच्च्या तेलाचे भाव एका डॉलरने वाढले तरीही लाखो डॉलर फायदा होतो. अशाप्रकारे सटोडिये कच्च्या तेलाच्या व्यवसायात अक्षरश: कोट्यवधी डॉलर एका जहाजातून कमावत असतात.जाता जाता एक माहिती साधारणत: व्हीएलसीसी क्षमतेच्या तेलवाहक जहाजाचे दिवसाचे भाडे ९ ते १० हजार डॉलर होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ते सध्या १,६५,००० डॉलर प्रति दिवसावर पोहोचले आहे. यावरून सटोडिये किती पैसा कमावत असतात, याचा अंदाज वाचकांना येईल.भारताची तेल साठवणूक क्षमताजगभरचे देश साधारणत: ३० दिवस पुरेल एवढ्या तेलाची साठवणूक करतात. भारतात ही क्षमता केवळ १० दिवसाची आहे. भारतातील २१ रिफायनरी दररोज ४० ते ५० लाख कच्चे तेल शुद्ध करत असतात. सध्या भारताची तेल साठवणूक क्षमता ५३० लाख टनाची आहे. तेल साठवणूक क्षमता कर्नाटकातील पुडूर (२५० लाख टन), मंगळुरू (१५० लाख टन) तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (१३० लाख टन) येथे आहे.

 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प