शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘क्षण एक पुरे...’ भावपूर्ण नाट्यप्रयोग

By admin | Updated: October 10, 2014 00:59 IST

प्रतिभावंत नाट्यलेखिकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने लेखिका नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव ११ आॅक्टोबरपर्यंत

पद्मगंधा प्रतिष्ठान : लेखिका नाट्य महोत्सवाचा प्रारंभ नागपूर : प्रतिभावंत नाट्यलेखिकांना प्रोत्साहित करणाऱ्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने लेखिका नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा महोत्सव ११ आॅक्टोबरपर्यंत सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सुरू आहे. यंदा या नाट्यमहोत्सवाचे १६ वे वर्ष होते.महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी, संस्थेच्या अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक शुभांगीताई भडभडे, नाट्य विभाग प्रमुख प्रतिभा कुळकर्णी, माला केकतपुरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध साहित्यिक सुधा डोंगरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या महोत्सवातील प्रारंभीचे नाटक ‘क्षण एक पुरे...’ आज सादर करण्यात आले. मानवी जीवनातील निरामय, सुखी व आनंदी जीवनानुभूतीसाठी अकृत्रिम व निरागस प्रेमभावना अनिवार्य असते. किंबहुना अशा हळुवार प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे वैराण वाळवंटच. या प्रेमाचे स्वरूप व्यक्तीसापेक्ष बदलत असले तरी त्याची अनिवारता, उत्कटता व समरसता मात्र सारखीच असते. ‘क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मररणांचा’ याच विषयाचे भावपूर्ण सादरीकरण करणारा हा प्रयोग होता. प्रतिभावंत लेखिका माणिक वड्याळकर लिखित व रोशन नंदवंशी दिग्दर्शित या दोन अंकी नाटकाने अखेरपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफलेले हे कथानक होते. अंथरुणाला खिळलेले वयोवृद्ध भाऊ, घरातील कर्तव्यदक्ष विधवा सून सुलभा, तिची लहान मुलगी मीनी व मोठ्या भावाच्या दुर्दैवी मृत्युनंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणारा तरुण नाना, या नानाशी लग्न करू इच्छिणारी मात्र या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नाकारणारी त्याची प्रेयसी तृप्ती. अखेर आईच्या मृत्यूनंतर खऱ्या प्रेमाची किंमत कळलेली तृप्ती आणि तिला प्रेमाचे जाणवलेले महत्त्व नाटकातून अधोरेखित करण्यात आले. यात श्याम आस्करकर, महेश गोडबोले, सीमा गोडबोले, विजय अंधारे, समृद्धी पुंजे, आकाश दुधनकर, नेहा अहेर यांनी भूमिका केल्या. नेपथ्य संजय काशीकर, अमोल निंबर्ते, संगीत अनिल इंदाणे, प्रकाश मिथून मित्रा, रंगभूषा आसावरी रामेकर, निर्मिती राजू बावनकर व सुनील आडगावकर, सहनिर्मिती रवींद्र फडणवीस यांची होती. (प्रतिनिधी)