शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात भुल्लर टोळीतील तिघांविरुद्ध मकोका

By admin | Updated: January 29, 2016 05:29 IST

व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या कुख्यात भुल्लर टोळीच्या म्होरक्यासह तिघांवर

नागपूर : व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या कुख्यात भुल्लर टोळीच्या म्होरक्यासह तिघांवर पोलिसांनी मकोका लावला आहे. पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रकारांना गुरुवारी दुपारी ही माहिती दिली. टोळीप्रमुख हरविंदरसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर (वय २९), त्याचा भाऊ हरजिंदरसिंग ऊर्फ पिंटू (वय २४) आणि जुजारसिंग कश्मीरसिंग ढिल्लो (वय २४, तिघेही रा. पाटणकर चौकाजवळ, जरीपटका) अशी या गुंडांची नावे आहेत. महिनाभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात भुल्लर टोळीने शहरातील व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा सपाटा लावला. राजकिरण ऊर्फ छोटू केवलराम हरियानी (वय ३७) याला आरोपी गोल्डी आणि जुजारसिंग यांनी १३ ते २२ जानेवारीदरम्यान मंगळवारी बाजार मैदान येथे बोलवले. हातातील चांदीचे बे्रसलेट दाखवून यासारखे सोन्याचे ब्रेसलेट पाहिजे, असे म्हणून ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितली. आरोपींच्या दहशतीमुळे हरियानीने त्यांना ८० हजार रुपये दिले. तर, याच गोल्डी भुल्लर आणि त्याचा भाऊ पिंटू भुल्लरने ५ ते १३ जानेवारीदरम्यान महेश ऊर्फ जितेंद्र टोपनदास लालवाणी (वय ३५, रा. हेमू कलानी चौक) या व्यापाऱ्याचे दीड लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्याला घरामागच्या मैदानात नेऊन बेदम मारहाण केली. खंडणी न दिल्यास ठार मारू, मुलाचे शाळेतून अपहरण करू, अशीही धमकी दिल्यामुळे लालवाणीने भीतीपोटी ५० हजार रुपये देऊन त्यावेळी स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान, खंडणीचा त्रास असह्य झाल्यामुळे या दोघांनीही पोलिसांकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, मार्च २०१५ मध्ये हे गुंड प्रतिस्पर्धी टोळीवर फायरिंग करून कारागृहात पोहोचले होते. जामिनावर परत येताच त्यांनी पुन्हा भाईगिरी सुरू केल्यामुळे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी त्याची गंभीर दखल घेतली. (प्रतिनिधी)शनिवारी नेणार कोर्टात ४हे तिघे शनिवारपर्यंत जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत आहेत. शनिवारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करून मकोकाची पुढील कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास एसीपी ढोले यांच्याकडे आहे. भुल्लर टोळीच्या आणखी काही गुंडांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावरही पोलीस कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. संबंधितांची कसून चौकशी सुरू असल्याचेही लाटकर यांनी सांगितले. या टोळीचा खरा सूत्रधार ‘कलेर’ याच्याही मुसक्या आवळण्याची पोलिसांनी तयारी चालवली असून, एका प्रकरणात त्याचा जामीन रद्द करण्यासाठी आज पोलिसांनी धावपळ केली. रवी कारवाला पसार या प्रकरणाशी संबंधित गहाण ठेवलेली ‘ती’ कार कुणाची त्याची माहिती फिर्यादीकडून मिळालेली नाही. चेसीस आणि इंजिन नंबरच्या आधारे कारमालकाचा शोध घेतला जात आहे. दुसरे म्हणजे, या कारबाबत इत्थंभूत माहिती रवी नामक तरुणाला आहे. परंतु, तो गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाल्याचे उपायुक्त लाटकर यांनी सांगितले. रवी हाती लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात, असेही लाटकर यांनी सांगितले. दरम्यान, १० दिवसांपूर्वीच ठाणेदार म्हणून जरीपटक्यात रुजू झालेल्या अशोक बागुल यांची बदली करण्यात आली. ते रुजू होताच भुल्लर प्रकरण समोर आले आणि त्यांची लगेच बदली झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रत्येक जण या बदलीच्या अनुषंगाने वेगवेगळे तर्क लावत आहेत. नेमके कोणते कारण आहे, त्याबाबत बोलण्याचे बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळले.