शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जर्मन जपान टोळीवर मोक्का

By admin | Updated: June 18, 2017 01:54 IST

शहरातील विविध भागात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात जर्मन जपान टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी

आठ दिवसात दुसरी कारवाई : एसआयटीचा प्रभाव वाढला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील विविध भागात प्रचंड दहशत असलेल्या कुख्यात जर्मन जपान टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. गुन्हेशाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते. वसीम ऊर्फ शेरा रशीद खान (वय २४), रशीद खान जरदार खान (वय ६५), अजहर खान रशीद खान (वय ३१), अमजद खान रशीद खान (वय ३३), राजा खान रशीद खान (वय ३५), परवेज खान जर्मन खान (वय ३४) आणि जावेद अन्सारी अब्दुल वहाब अन्सारी (वय ४८) असे मोक्का लावलेल्या जर्मन-जपान टोळीतील गुंडांची नावे आहेत. त्यांचा म्होरक्या अजहर खान असून, तो गंगानगरात राहतो. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, लुटमार, घर, जमिनीवर जबरदस्तीने कब्जा मारणे, अपहरण करणे, वाहन हिसकावून नेणे आणि अशाच प्रकारच्या अनेक गंभीर गुन्ह्यात जर्मन जपान टोळीचे गुंड सहभागी असून, शहरातील विविध भागात या टोळीची प्रचंड दहशत आहे. जरीपटका, गिट्टीखदान, मानकापूर, वाडीसह विविध पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तूर्त गिट्टीखदान आणि जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असे उपायुक्त कदम यांनी स्पष्ट केले. २०११ मध्ये जाफरनगरातील रसूल प्राथमिक शाळेवर कब्जा करून या टोळीतील गुंडांनी शाळा संचालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या आणि एक चांगली शाळा बंद पाडली. शाळेचा ताबा सोडण्यासाठी शाळा संचालिका शमसुन्निसा पठाण (वय ६२) यांना ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणाची तक्रार करूनही तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी शमसुन्निसा यांना न्याय देण्याऐवजी जर्मन जपान टोळीच्या गुंडांनाच मदत केली. त्यामुळे शमसुन्निसा प्रचंड दहशतीत आल्या होत्या. गुन्हेगारांची घरवापसी गेल्या वर्षी उपराजधानीतील गुंडांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई करण्याचा धडाका लावल्याने बहुतांश कुख्यात गुन्हेगार शहराबाहेर पळून गेले होते. मात्र, गेल्या काही महिन्यात पोलीस शांत झाल्याचे पाहून सर्वच्या सर्व गुन्हेगारांनी घरवापसी केली. एवढेच काय, नागपुरातून हद्दपार करण्यात आलेले अनेक गुन्हेगारही शहरातच वास्तव्य करीत आहेत. गेल्या आठ दिवसात गुंडांच्या दोन टोळ्यांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केल्यामुळे गुंडांच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. परवेजविरुद्ध १५ प्रकरणात गुन्हे या टोळीतील परवेज खान जर्मन खान याच्याविरुद्ध वेगवेगळ्या १५ प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अजहरविरुद्ध ५, वसिमविरुद्ध ४, रशिदविरुद्ध ३, अमजदविरुद्ध २ तर राजा खान आणि जावेद अन्सारीविरुद्ध प्रत्येकी एका प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. एसआयटीने परवेज, रशिद आणि वसिम वगळता अन्य सर्वांना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.