शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

चेनस्नॅचर्सच्या टोळीविरुद्ध मोक्का

By admin | Updated: May 4, 2016 03:38 IST

उपराजधानीत सोनसाखळी चोरीचे एका पाठोपाठ तब्बल १६ गुन्हे करणाऱ्या कुख्यात चेनस्नॅचर्स टोळीविरुद्ध सीताबर्डी

नागपूर : उपराजधानीत सोनसाखळी चोरीचे एका पाठोपाठ तब्बल १६ गुन्हे करणाऱ्या कुख्यात चेनस्नॅचर्स टोळीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी मोक्का लावला आहे. तीन जणांच्या या टोळीत एका सराफा व्यापाऱ्याचाही सहभाग आहे. सहायक पोलीस आयुक्त एन.डी. इंगोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.मोहम्मद साजीद ऊर्फ बाबा फैज मोहम्मद सिद्दीकी (वय ३२, रा. मोठा ताजबाग), अप्पू ऊर्फ शफीक रफीक खान (रा. बहादुरा, नंदनवन) आणि या दोघांकडून चोरीचे सोने विकत घेणारा सराफा व्यावसायिक राकेश शरदचंद्र निनावे (वय २७, रा. भोतमांगे लेआऊट, बहादुरा नंदनवन) अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. ३१ जानेवारीला एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सोनसाखळी साजीद आणि अप्पूने हिसकावून नेली होती. ही तक्रार मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी प्रारंभी साजीदला अटक केली; नंतर त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावणारा सराफा राकेश निनावे याच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उपायुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बंडीवार यांनी पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू. मत्ते, आर.के. मुंढे, महिला उपनिरीक्षक एम.एच. वाघाडे, हवालदार अजय काळे, नारायण किराड, नायक प्रशांत निनावे, कमलेश गणेर, अतुल चाटे, प्रेम पाटील यांचे पथक छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित कांकेर जिल्ह्यात पाठविले. तेथून पोलिसांनी कुख्यात अप्पूला पकडून नागपुरात आणले. चौकशीत या तिघांनी सीताबर्डीत तीन, कळमन्यात दोन, हुडकेश्वर पाच, प्रतापनगर दोन आणि धंतोलीत दोन तसेच अन्य दोन अशा चेनस्रॅचिंगच्या एकूण १६ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील १० गुन्ह्यातील सोने पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले होते. साजीद आणि अप्पू एक वर्षापासून गुन्हे करीत होता, असेही तपासात स्पष्ट झाले होते. या तिघांचे गुन्हेगारी कृत्य संघटित गुन्हेगारीचे असल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आल्याचे ठाणेदार बंडीवार यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)लोकमतने दिले होते वृत्त ‘लोकमत’ने २० फेब्रुवारीच्या अंकात सीताबर्डीत पकडण्यात आलेल्या चेनस्नॅचर्सच्या नाकात मोक्काची वेसण टाकण्यात येणार असल्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. पत्रकार परिषदेतही त्याचा उल्लेख झाला, हे विशेष.