शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अनन्याच्या पत्राने भारावले मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:30 IST

अनन्या वशिष्ठ वय वर्षे ६, या चिमुकलीच्या पत्रातील मायना वाचून कुणी थक्क होईल, तिला लगेच प्रतिउत्तर देईल, अशी शक्यता तशी कमीच.

ठळक मुद्देसहा वर्षांच्या चिमुकलीला पाठविले प्रतिउत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनन्या वशिष्ठ वय वर्षे ६, या चिमुकलीच्या पत्रातील मायना वाचून कुणी थक्क होईल, तिला लगेच प्रतिउत्तर देईल, अशी शक्यता तशी कमीच. पण या चिमुकलीने एक पत्र थेट या देशाच्या पंतप्रधानांना लिहिले आणि कुणाच्याही ध्यानीमनी नसताना, स्वत: पंतप्रधानांनी या पत्राची दखल घेत, चिमुकलीच्या पत्राला प्रतिउत्तरही पाठविले.देशाचा पंतप्रधान म्हणजे कायम कामात गुंतलेला, अशा स्थितीत एखाद्या चिमुकलीचे पत्र वाचून तिला प्रतिउत्तर पाठविणे ही तशी अशक्यप्राय गोष्ट परंतु, वर्तमान पंतप्रधानांच्या सजग व लोकाभिमुख वृत्तीमुळे असे घडले असून, अनन्या वशिष्ठ हिला पाठविलेल्या पत्रामुळे तिच्या कुटुंबीयांनाही कुतुहल वाटते आहे.वाडी परिसरातील लाईफस्टाईल सोसायटीमध्ये राहणाºया अनन्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहून पत्र पाठविले होते. पहिल्या वर्गात शिकणाºया अनन्याने पेन्सिलने संस्कृतमध्ये शुभेच्छा लिहिल्या. त्याचबरोबर तिने स्वच्छ भारत अभियान व बेटी बचाव या अभियानाची चित्रेसुद्धा काढली आणि वडिलांच्या मदतीने थेट पंतप्रधान कार्यालयाला पोस्ट केले होते.चिमुकलीने पेन्सिलीने लिहिलेल्या पत्राला पंतप्रधान का बरे उत्तर देतील, असा विचार करून अनन्याचे कुटुंबीय विसरले होते.मात्र १० आॅक्टोबर रोजी अनन्याच्या नावाने नवी दिल्लीतून पोस्टाने एक पत्र आले. तेही थेट पंतप्रधान कार्यालयातून. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी अनन्याने दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद तर दिलेच होते, शिवाय तिचे आगळवेगळे अभीष्टचिंतन ऊर्जा वाढविणारे असून, पुढे दुप्पट जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे, असे ही मोदींनी पत्राद्वारे कळविले.पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या प्रयत्नांनी स्वच्छ भारत झाल्याशिवाय राहणार नाही असेही या पत्रात नमूद केले आहे.अनन्या दाभा येथील सांदीपनी शाळेची विद्यार्थिनी आहे. ती पहिल्या वर्गात शिकते, ड्रॉर्इंग काढणे, खूप खेळणे आणि सामान्य ज्ञानासंदर्भात माहिती गोळा करणे तिला आवडते.