शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

वीज मीटरमध्ये फेरफार, फौजदारी गुन्हा, अडीच कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

वर्षभरात १३७६ ग्राहकांवर कारवाई : तीन वर्षांत ४,२७० जणांवर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास ...

वर्षभरात १३७६ ग्राहकांवर कारवाई : तीन वर्षांत ४,२७० जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. मागील वर्षभरात नागपूर परिमंडळात सुमारे १,३७६ ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून अडीच कोटी रुपये एवढा दंडही वसूल करण्यात आलेला आहे.

वीज मीटरमध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात. वीज मीटरमध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत कायद्यानुसार मोठा गुन्हा असून, याअंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच अशा ग्राहकावर मीटर रीडिंगच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. प्रतिकेडब्ल्यूएचपीनुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये, वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये, कृषी ग्राहकावर १ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकांवर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येते. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्याविरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.

-बॉक्स

-वीज चोरीसाठी अशीही चलाखी

वीज मीटरमध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मॅग्नेट किंवा चिप लावून मीटरची गती कमी केली जाते. रिमोटच्या माध्यमातूनही असे प्रकार करण्यात आल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.

-बॉक्स

- फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड

वीज मीटरमध्ये फेरफार करणे हा गंभीर गुन्हा आहे. वीज विद्युत कायदा कलम १३५ आणि १५० अंतर्गत यात गुन्हा दाखल होऊ शकतो. यात एक हजार रुपयापासून१० हजार रुपयांपर्यंत आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.

-बॉक्स

मागील तीन वर्षांतील कारवाई

वर्ष ग्राहकांवर कारवाई दंड वसूल (लाखात)

२०१८-१९ - १,४४६ - २९९.९१

२०१९-२० -१,४४८ - २४९.७६

२०२०-२१ - ९१५ - १७३.३८ लाख

मार्च २०२१ पासून आतापर्यंत - ४६१ - ८४.२०

-बॉक्स

मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांवर करडी नजर

महावितरणची वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यावर कडक नजर असून मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त करण्यात येते. जबर दंडात्मक कारवाईही केली जाते आणि फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांनी असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता वीज बिलांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.

दिलीप दोडके - मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ, महावितरण