शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने देशाला दिशा दिली

By admin | Updated: May 27, 2016 02:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या.

निहाल चंद मेघवाल : दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे अभिनंदननागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. देशाला विकासाची नवी दिशा दिल्याचा दावा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री निहाल चंद मेघवाल यांनी गुरुवारी केला. केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भाजपतर्फे शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर आदी उपस्थित होेते. जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची बँकेत खाते उघडून ३६ हजार कोटी जमा केले. नरेगाच्या माध्यमातून गरीब लोकांना ४६ हजार कोटींचा लाभ झाला. प्रधानमंत्री कोष योजना, प्रधानमंत्री विमा योजना, गरिबांना स्वयंपाकाचा गॅस अशा योजना हाती घेतल्या. ग्रामपंचायतींना दोन लाख कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीला भाजपचे पाच वर्षांचे सरकार भारी पडेल. मोदी १० वर्षे पंतप्रधानपदी राहिले तर या देशाला गतवैभव प्राप्त होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहराच्या विकासासाठी १८ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती मेघवाल यांनी दिली. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. कामकाजाच्या प्रगतीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहरात विकासाची गंगा आल्याचे सुधाकर कोहळे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.व्यासपीठावर उपमहापौर सतीश होले, माजी महापौर अर्चना डेहनकर, माया इवनाते, जि.प.चे शिक्षण सभापती उकेश चव्हाण आदी उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी मानले.(प्रतिनिधी)काँग्रेसचे आरोप निराधारमोदी सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० ते ८० लाखांचा निधी उपलब्ध केला. सिंचन व पाणीपुरठ्याच्या योजनांना प्राधान्य दिले. पाच वर्षांनंतर देशाचा विकास झालेला दिसेल. त्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारवर केलेले आरोप निराधार असल्याचे निहाल चंद मेघवाल यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.