शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी करणार दीक्षाभूमीवर ध्यान साधना

By admin | Updated: April 14, 2017 02:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

तब्बल साडेतीन तास नागपुरात : भरगच्च कार्यक्रम नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. तब्बल साडेतीन तास ते नागपुरात राहतील. यावेळी ते दीक्षाभूमीला भेट देऊन ध्यान साधना करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी १०.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे स्वागत करतील. विमानतळावरून पंतप्रधान थेट दीक्षाभूमीसाठी रवाना होतील. सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीला भेट देतील. दीक्षाभूमीवर ते जवळपास २० मिनिटे घालवतील. यावेळी सर्वप्रथम ते दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मध्यवर्ती स्मारकात जातील. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश आणि तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करतील. मध्यवर्ती स्मारकामध्येच ते सुमारे पाच मिनिटे ध्यान साधना करणार आहेत. पंतप्रधानांच्या ध्यान साधनेसाठी स्मारक समितीच्यावतीने स्मारकामध्ये विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर स्मारकातील वरच्या ‘डोम’वरून पंतप्रधान दीक्षाभूमी परिसराची पाहणी करतील. यानंतर दीक्षाभूमीच्या व्हीजिट बुकमध्ये ते आपला अभिप्राय लिहितील. (प्रतिनिधी)दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष स्वागत केले जाईल. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणि दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले जाईल. यावेळी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, विजय चिकाटे, एन.आर. सुटे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील. दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्म व सामाजिक क्रांती घडवून आणली, ती दीक्षाभूमी आज जगभरातील शोषितांची प्रेरणा भूमी बनली आहे. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी’ या टपाल तिकिटाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानकापूर येथील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.