शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शवागारांचे २०२० पर्यंत आधुनिकीकरण

By admin | Updated: July 13, 2017 02:39 IST

राज्यातील २२ शासकीय रुग्णालयांमधील शवागारांचे २०२० पर्यंत आधुनिकीकरण करण्यात येईल,

हायकोर्टात शासनाची ग्वाही : संबंधित जनहित याचिका निकाली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील २२ शासकीय रुग्णालयांमधील शवागारांचे २०२० पर्यंत आधुनिकीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात सहयोग ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांनी शासनाची ग्वाही लक्षात घेता ही याचिका निकाली काढली. गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील शवागाराचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने १ आॅक्टोबर २०१४ रोजी दिला होता. त्यानुसार स्थापन समितीने गोव्यातील शवागाराचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. गोव्यातील शवागारात आधुनिक अवजारांच्या मदतीने शवविच्छेदन केले जाते. परिसरात दुर्गंधी नाही. शवविच्छेदनाची खोली सभागृहासारखी आहे. डॉक्टर शवविच्छेदन करीत असताना प्रशिक्षणार्थी एका ठिकाणी बसून मोठ्या स्क्रीनवर प्रक्रिया पाहू शकतात. मृतदेहाची माहिती संगणकात साठवून ठेवली जाते. त्यामुळे कागदी फाईल जपून ठेवण्याची आवश्यकता नाही. कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. चौकशी केंद्र आहे अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. अहवालाला छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. राज्यातील शवागारे याच धर्तीवर विकसित करणे अपेक्षित आहे. सध्या शवागारांची अवस्था चांगली नसून शवागारांत उंदीर, घुस, मुंगूस अशा कुरतडणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे अनेकदा शव कुरतडण्याच्या घटना घडतात. ही मनुष्य देहाची विटंबना आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. स्मिता सिंगलकर यांनी बाजू मांडली.