शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोर सीसीटीव्हीत अडकला

By admin | Updated: August 11, 2016 02:14 IST

आपल्या घरात झोपलेल्या एका तरुण डॉक्टरचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. गुरुदेवनगर नंदनवन येथे सकाळी सात-सव्वासात वाजता...

गुरुदेवनगर नंदनवन येथील घटना : घरात झोपलेल्या डॉक्टरचा मोबाईल नेला चोरून नागपूर : आपल्या घरात झोपलेल्या एका तरुण डॉक्टरचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. गुरुदेवनगर नंदनवन येथे सकाळी सात-सव्वासात वाजता घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुमित पैडलवार (२३) असे या तरुण डॉक्टरचे नाव. तो प्लॉट नंबर २६२ गुरुदेवनगर नंदनवन येथे राहतो. घरी वडील गुलाबराव, आई सारिका, मोठा भाऊ वैभव, व कुणाल आणि आजी विठाबाई लिंगतवार राहतात. आई वडील दोघेही कामठीला नोकरी करतात. ते सकाळीच कामाला निघून जातात. दोन्ही भाऊ इंजिनियरिंग करीत आहेत. घरी आजी एकटीच असते. ९ आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे सुमितचे आईवडील सकाळीच कामाला निघून गेले. दोन्ही भाऊ आपापल्या खोलीत अभ्यास करीत होते. सुमित हा हॉलमध्ये झोपला होता. सकाळी ७.१७ वाजताच्या सुमारास एक २२ ते २३ वर्षाचा तरुण एका पायाने लंगडत चालत सुमितच्या घरासमोर असलेल्या घरी गेला. तेथून लगेच परत आला. त्यानंतर तो सुमितचा घरचा उघड्या गेटमधून आत आला. दरवाजावर काही वेळ तो उभा राहिला. दरम्यान खिशातून त्याने एक कागद बाहेर काढला व तो कुणाशी बोलत असल्याचे भासवू लागला. दरम्यान तो घरात डोकावून पाहू लागला. घरात कुणी नसल्याचे त्याला दिसले. सुमित हॉलमध्ये झोपला होता. तो तरुण आत आला आणि सुमितजवळ असलेला मोबाईल उचलला आणि आपल्या पॅण्टच्या मागच्या खिशात टाकून बाहेर पडला. यावेळी घरात सुमितची आजी व दोन्ही भाऊ होते, पण ते आतल्या खोलीत होते. उठल्यावर मोबाईल दिसत नसल्याने सुमितने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी) नंदनवन पोलिसांनी केली हरवल्याची नोंद गुरुदेवनगर सोसायटीमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने चोऱ्या होत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पैडलवार कुटुंबीयांनी सहा महिन्यांपूर्वीच घरी तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यामध्ये एक मुलगा मोबाईल चोरून नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनाही ते फुटेज दाखवण्यात आले, असे असतानाही नंदनवन पोलिसांनी मात्र केवळ मोबाईल हरवल्याची नोंद केली. या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण झाला आहे.