सावनेर : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व माेबाईल असा एकूण १५,५०० रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरडी येथे घडली.
रमेश मनरलाल काेरी (२८, रा. भितरी, ता. चुराड, जिल्हा सिंधी, मध्य प्रदेश) हा भाेजराज शामराव धुंदे यांच्या शेरडी (आजनी) शिवारातील शेतात असलेल्या घरी राहताे. ताे शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना चाेरट्याने त्याच्या घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने त्याच्या बॅगेतील १५ हजार रुपये राेख व ५०० रुपयांचा माेबाईल असा एकूण १५,५०० रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक फाैजदार राजेंद्र यादव करीत आहेत.