काटाेल : शहरातील बाजार परिसरात माेबाईल चाेरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (दि.२१) या चाेरट्यांनी डाव साधत सात जणांचे महागडे माेबाईल हॅण्डसेट लंपास केले.
काटाेल येथे मंगळवारी बाजार भरताे. बाजारातील गर्दीचा फायदा घेत चाेरट्यांनी नीलेश राठाेड (रा. धानाेरा), सतीश पुरी (रा. बेलाेना), वसंता रेवतकर (रा. जानकीनगर, काटाेल), हिरामण सकर्डे (रा. पंचवटी, काटाेल), प्रेमसिंग पडाेलिया (रा. पंचवटी, काटाेल), अनिल भस्मे (रा. काटाेल) व सुरेंद्र खाेडेकर (रा. आययूडीपी, काटाेल) या सात जणांचे माेबाईल हॅण्डसेट चाेरून नेले. ही बाब ध्यानात येताच त्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. शहरात माेबाईल चाेरट्यांची टाेळी सक्रिय झाल्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पाेलिसांनी दिल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज चाैधरी करीत आहेत.