शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक तालुक्यात मनसेने खाते उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) घेण्यात आली. यात सहा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि. ११) घेण्यात आली. यात सहा सरपंचांची अविराेध निवड करण्यात आली असून, दाेन ठिकाणी निवडणूक घेण्यात आली. शिवाय, एक सरपंचपद उमेदवाराअभावी रिक्त राहिले. तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते उघडले असून, सहा ठिकाणी काँग्रेस समर्थित व एका ठिकाणी शिवसेना समर्थित गटाच्या सरपंचाने बाजी मारली.

पथरई येथील सरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थित गटाचे संदीप वासनिक तर उपसरपंचपदी शिवसेना समर्थित गटाचे चंद्रभान वरठी यांची अविराेध निवड करण्यात आली. संदीप वासनिक हे रामटेक तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थित गटाचे एकमेव सरपंच आहेत. खुमारी येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटाच्या संगीता पाटील यांनी विराेधी गटाच्या आम्रपाली माेहबे यांना पराभूत केले. संगीता पाटील यांना आठ तर आम्रपाली माेहबे यांना तीन मते मिळाली. येथे उपसरपंचपदाच्या निवडणुकीत गणेश कवडू यांनी रंजना नारनवरे यांचा सात मतांनी पराभव केला. गणेश कवडू यांना नऊ तर रंजना नारनवरे यांना दाेन मते मिळाली.

पंचाळा (बु.) येथे काँग्रेस व भाजप समर्थित गटांची युती हाेती. येथील सरपंचपदी काॅंग्रेस समर्थित गटाच्या प्रगती माटे विजयी झाल्या. त्यांनी वर्षा मडामे यांचा तीन मतांनी पराभव केला. प्रगती माटे यांना सात तर वर्षा मडामे यांना चार मते मिळाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप समर्थित गटाचे याेगेश मात्रे यांनी विजय संपादन केला. त्यांनी सिस्टरीन रामप्रकाश पचारे यांचा तीन मतांनी पराभव केला. याेगेश मात्रे यांना सात तर सिस्टरीन पचारे यांना चार मते मिळाली. येथे काॅंग्रेस समर्थित गटाला स्पष्ट बहुमत मिळाले हाेते.

शिवनी (भाें.) येथे काँग्रेस समर्थित गटाला स्पष्ट बहुमत असून, शिवसेना समर्थित गटाला तीन जागा मिळाल्या. शिवसेना समर्थित गटाने काॅंग्रेस समर्थित गटाला पाठिंबा देत उपसरपंचपद मिळवून घेतले. येथे सरपंचपदी काॅंग्रेस समर्थित गटाचे विजय भुरे तर उपसरपंचपदी शिवसेना समर्थित गटाचे भाेजराज धुवाधपार यांची बिनविराेध निवड करण्यात आली. किरणापूर येथे सरपंचपदी श्रीकिसन उईके यांची तर उपसरपंचपदी रामेश्वर हटवार यांची अविराेध निवड करण्यात आली. दाेन्ही उमेदवार काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य आहेत. मानापूर येथील सरपंचपदी शिवसेना समर्थित गटाचे संदीप सावरकर तर उपसरपंचपदी शिवसेना समर्थित गटाचे भारत अडकणे बिनविराेध विजयी झाले. चिचाळा येथील सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या कविता बसेने तर उपसरपंचपदी सुनील गयगये बिनविराेध निवडून आले.

....

दाहाेदा येथील सरपंचपद रिक्त

दाहाेदा येथील सरपंचपद यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित केले हाेते. येथे या प्रवर्गासाठी एकही वाॅर्ड आरक्षित करण्यात आला नव्हता. त्यामुळे सरपंचपदाचा उमेदवारच मिळाला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले आहे. येथे उपसरपंचपदी काॅंग्रेस समर्थित गटाचे स्वप्नील सर्याम बिनविराेध निवडून आले. या निवडणुकीत काॅंग्रेसने त्यांचा गड कायम राखला. नेत्यांनी सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीपूर्वी नवनिर्वाचित सदस्यांना तीर्थयात्रा व पर्यटन घडवून आणले.

...

देवलापार येथे सत्तांतर

देवलापार येथील सरपंचपदी शाहिस्ता इलीयाज खान पठाण तर उपसरपंचपदी विनाेद मसराम यांची बिनविराेध निवड करण्यात आली. दाेघेही काॅंग्रेस समर्थित गटाचे सदस्य आहेत. ही ग्रामपंचायत पूर्वी भाजप समर्थित गटाकडे हाेती. यावेळी येथे मतदारांनी सत्तांतर घडवून आणले. भाजपने रामटेक तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर बहुमत मिळाल्याचा दावा केला हाेता. मात्र, त्यांना एका उपसरपंचपदावर समाधान मानावे लागले असून, एकाही ठिकाणी सरपंचपद मिळाले नाही.