शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे बँक खाते गोठविले

By admin | Updated: November 4, 2016 02:21 IST

महापालिका आस्थापनेवरील ४५०० सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची १५ कोटींची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्याने भविष्य निर्वाह निधी

भविष्य निर्वाह निधी विभागाची कारवाई : कर्मचाऱ्यांचे १५ कोटी रुपये थकीतनागपूर : महापालिका आस्थापनेवरील ४५०० सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची १५ कोटींची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्याने भविष्य निर्वाह निधी विभागाने महापालिकेचे बँक खाते गोठविले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने महापालिका प्रशासनापुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे. महापालिके तील अस्थायी कर्मचाऱ्यांना २०११ सालापासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे.तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम विभागाकडे जमा करणे आवश्यक होती. परंतु महापालिका प्रशासनाने २०१३ पासून अस्थायी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याची भूमिका घेतली होती. २०११ पासूनचा भविष्य निर्वाह निधी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने यापूर्वीही महापालिकेची बँक खाती गोठविली होती. त्यावेळी अस्थायी कर्मचाऱ्यांना २०११ पासून ही योजना लागू करण्याची ग्वाही दिली होती. महापालिकेने या आशयाचे शपथपत्र लिहून दिले होते. त्यानंतरही रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने बुधवारी महापालिकेची बँक खाती गोठविण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरल्याशिवाय महापालिकेला बँक खात्यातून कोणत्याही स्वरुपाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. यामुळे महापालिका प्रशासनापुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)आर्थिक स्थितीचा फटका वर्षभरापूर्वी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या मोबदल्यात राज्य सरकारकडून अपेक्षित अनुदान प्राप्त होत नाही. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा विकास कामांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही. लवकरच तोडगा निघेलमहापालिका आस्थापनेवरील अस्थायी कर्मचाऱ्यांचा २०१३ पासून भविष्य निर्वाह निधी जमा केला जात आहे. परंतु २०११ ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीतील १५ कोटींची रक्कम भरावी, अशी भूमिका भविष्य निर्वाह निधी विभागाने घेतली आहे. यासाठी महापालिकेच्या बँक खात्यातील व्यवहार थांबविले आहेत. यावर लवकरच तोडगा निघेल. -मदन घाडगे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, महापालिका