शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांकडे कोट्यवधींची वीजबिल थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 07:00 IST

Nagpur News राज्यातील अनेक खासदार व आमदार वीजबिल भरत नसून महावितरण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. कंपनीची थकबाकी आता सुमारे ६५ हजार कोटी रुपये आहे हे विशेष.

ठळक मुद्देमहावितरणला वसुलीची पर्वाच नाहीपटोले, दानवे, थोरात, विखे-पाटील आदींचा समावेश

आशिष रॉय

नागपूर : जर सामान्य ग्राहकाने हजार रुपयांचे वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून वीज जोडणी तोडण्यात येते. मात्र, जर तुम्ही खासदार किंवा आमदार असाल व सात लाख रुपयांची थकबाकी असेल तरी देखील वीजपुरवठा अखंडपणे सुरू राहील. राजकारण्यांवर कंपनी मेहरबान असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक खासदार व आमदार वीजबिल भरत नसून महावितरण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. कंपनीची थकबाकी आता सुमारे ६५ हजार कोटी रुपये आहे हे विशेष.

महावितरणचे थकबाकीदार खासदार आणि आमदारांची जिल्हानिहाय यादी ‘लोकमत’ला मिळाली आहे. या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठा नेते संभाजीराजे भोंसले, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आदी अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे.

माण (जि. सातारा) येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे सर्वांत मोठे थकबाकीदार आहेत, त्यांच्याकडे ७ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. अनेक राजकारण्यांकडे एकाहून अधिक कनेक्शन आहेत आणि त्यांनी त्यापैकी एकाचेही बिल भरलेले नाही. हे कनेक्शन बहुतेक निवासी आणि कृषी आहेत; परंतु काही व्यावसायिक देखील आहेत.

जिल्हानिहाय यादी

मराठवाडा

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे (रु. ३१,७२५), सूरज लोलगे (रु. १,१३,२७९), विलास भुमरे (रु. १,५०,९८०)

जालना – रावसाहेब दानवे (रु. २१,६७४, रु. ३५,१९७, रु. २५,१९४, रु. १०,०९३, रु. ८०,८३६, रु. ८०,६३२), अमरसिंग खरात (रु. २,४२,२६७), बबनराव यादव (रु. १,०८,६५८)

बीड – रजनी पाटील (रु. ३,०७,९८४), प्रकाश सोळंके (रु. २१,१६०, रु. ५९,१७७), संदीप क्षीरसागर (रु. ३४,९७९, रु. ७०,३८७, रु. १,२३,०६४)

लातूर – संजय बनसोडे (रु. ५३,३१९), शिवाजीराव पाटील (रु. १७,९०७, रु. १३,१२२, रु. १९,६७६, रु. १९,६८०), बाबासाहेब पाटील (रु. १,४५,७७५, रु. १९,६८०)

उस्मानाबाद – ज्ञानराज चौगुले (रु. ४९,६९८, रु. २६,५०६), मधुकर चव्हाण (रु. ८०,९४८), रवींद्र गायकवाड (रु. ११,०८४, रु. १३,९७०)

परभणी – कल्याण रेंगे (रु. १,२७,९६२), सुरेश वरपुडकर (रु. २४,८६१, रु. २०,९२८)

कोकण

रायगड – नृपाल जयंत पाटील (रु. ३,६०,०३५), मानसी महेंद्र दळवी (रु. २,१६,६४८)

ठाणे – दिना पाटील (रु. ३८,७३७), रमेश पाटील (रु. १,१७,९८८)

उत्तर महाराष्ट्र

जळगाव – शिरीष मधुकरराव चौधरी (रु. ६७,९६८), सुरेश भोळे (रु. १,३४,७८८)

नंदुरबार – विजयकुमार गावित (रु. ४२,१३१)

अहमदनगर – शिवाजीराव कर्डिले (रु. ३८,१५१, रु. ५९,६७०), राहुल जगताप (रु. २८,५४९), रामदास शिंदे (रु. ८२,१४५), बाळासाहेब थोरात (रु. १०,८४९), राधाकृष्ण विखे-पाटील (रु. ११,१५२)

नाशिक – भुजबळ वाईन्स (रु. २४,०८८), दिलीप बोरसे (रु. ५७,९३०), संजय चव्हाण (रु. ५७,३२९, रु.२९,८२२), सुहास कांदे (रु. १९,१७६), हिरामण खोसकर (रु. २७,३४७, रु. २९,८२९, रु.२१,९३५)

विदर्भ

बुलढाणा - प्रताप जाधव (रु. ६४,२७३, रु. ६५,११०, रु. २२,३३०)

अमरावती – रवी राणा (रु. ३८,६७२), यशोमती चंद्रकांत ठाकूर (रु. ८८,२६७), राजकुमार पटेल (रु. ७३,८२०)

भंडारा - नाना पटोले (रु. १,३१,१६२, रु ४७,७६२, रु ७१,३२०, रु ४७,१६६)

नागपूर – अनिल देशमुख (रु. १,११,८९२, रु. १,२२,७५१), आशिष जैस्वाल (रु. १,३६,६८३, रु. १,९९,०२६), मोहन मते (रु. ३५,४७२)

पश्चिम महाराष्ट्र

पुणे – बापूसाहेब पठारे (रु. ३७,०८६), संग्राम थोपटे (रु. ८८,७३०), दिलीप मोहिते (रु. ७७,६६३, रु ८७,१७२, रु. २,६६,०३९)

सातारा – जयकुमार गोरे (रु. ७,०३,४७३), महेश शिंदे (रु.६८,१७१ )

सोलापूर – रणजितसिंह मोहिते-पाटील (रु. १४,०५६, रु. १,७१,१६०), प्रभाकर परिचारक (रु. १,११,७२७), राजेंद्र राऊत (रु. ७२,४१९, रु. २,४१,४४५, रु. १०,८७०), बबनराव शिंदे (रु. १०,९२१, रु.११,०७४, रु. १३,९४९, रु. १७,२४२, रु. १०,९२६, रु. १०,९२५, रु. ११,०७२), संजय शिंदे (रु. २७,९४१, रु. ६५,५५६, रु. ५१,३२७, रु. २१,४३४, रु. ९५,९६६, रु.५६,१७८)

कोल्हापूर – संभाजीराजे भोसले (रु. १,२५,९३२), राजेंद्र पाटील (रु.८९,१५०)

सांगली – विश्वजित कदम (रु. २४,०६३, रु. १८,२१०), अनिल बाबर (रु. २४,२२२), दत्तू खाडे (रु. ३७,७४७, रु. २५,७२७, रु. २९,४९२, रु. ३४,६९४, रु. ७९,७१५, रु. ७९,७१५, रु.१,३९,३९५, रु.५१,८६५, रू.४९,८९५), सुमन सदाशिव खोत (रु. ११,८४२, रु. १,२३,५९१), विक्रमसिंह सावंत (रु. १,२७,६६८), शिवाजीराव नाईक (रु. ६२,१४१), सुरेश पाटील (रु. २४,१३७, रु. २४,३५२)

टॅग्स :mahavitaranमहावितरण