शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी विकास निधीतून दत्तक गावांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 02:50 IST

ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी खासदार, आमदारांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे.

जि.प.सभेत सदस्य आक्रमक : दत्तक गावांसाठी १५ क ोटींची मागणीनागपूर : ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी खासदार, आमदारांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने दत्तक ग्राम योजना हाती घेतली आहे. जि.प.सदस्यांनी गावे दत्तक घेतलेली आहेत. परंतु सदस्यांना मोजकाच विकास निधी मिळतो. त्यामुळे सदस्यांनी जि.प.च्या माध्यमातून दत्तक गावांतील विकास योजनांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले. परंतु काही आमदारांनी विकास निधीच्या यादीतून सदस्यांच्या दत्तक गावांना कात्री लावली आहे. याचे पडसाद शनिवारी सर्वसाधारण सभेत उमटले. सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत दत्तक गावांच्या विकासासाठी १५ कोटींची मागणी केली. उज्ज्वला बोढारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जि.प.च्या ३७ सदस्यांनी गावे दत्तक घेतलेली आहेत. परंतु या सदस्यांना वर्षाला ७ ते ८ लाखांचा विकास निधी मिळतो. यातून दत्तक गावातील विकास कामे शक्य नाही. त्यामुळे दत्तक घेतेल्या हिंगणा तालुक्यातील डेकना(बु.) गावातील विकास कामासाठी निधी प्राप्त व्हावा. यासाठी जि.प.च्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव नाकारण्यात आला. शासनाकडूनही विशेष निधी मिळत नाही. त्यामुळे सदस्यांनी या गावांचा विकास कसा करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदस्यांना गाव दत्तक घेण्याचा आग्रह नव्हता. त्यांच्या इच्छेवर अवलंबून होते. नियोजन समितीकडे सदस्यांनी दिलेले प्रस्ताव पाठविण्यात आले. परंतु काही आमदारांनी सदस्यांची गावे वगळली आहेत. दत्तक गावांना शासनाकडून स्वतंत्र निधी मिळणार नसल्याची माहिती जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनीही दत्तक गावांच्या विकासासाठी शासनाने प्रत्येक सदस्यांना २५ लाख असा एकूण १४.५० कोटींचा निधी उपलब्ध करावा. यासाठी शासनाकडे मागणी करण्याची सूचना केली. चंद्रशेखर चिखले यांनीही दत्तक गावांसाठी निधी देण्याची मागणी केली. सदस्यांनी सुचविलेल्या दत्तक गावातील विकास कामांचे भूमिपूजन करताना सदस्यांना डावलण्यात येते. अशा वातावणात आदर्श ग्राम कसे निर्माण होईल, असा प्रश्न कुंदा आमदरे यांनी उपस्थित केला. कामठी पंचायती समितीत विस्तार अधिकारी गेल्या १२ वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यांची बदली होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ग्रामीण भागातील शाळांना घरगुती दराने वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी बोढारे यांनी केली. कृषी ,पशुसंवर्धन, समाजकल्याण व महिला बाल कल्याण विभागातील प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. उपाध्यक्ष शरद डोणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती आशा गायकवाड, समाजल्याण सभापती दीपक गेडाम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा वाघाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)