शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरुन मित्राचीच केली हत्या

By admin | Updated: April 22, 2017 17:29 IST

क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. 22 -  क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.  किरण सदाशिव सिंधी मेश्राम (वय २२) असे मृताचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस  ठाण्याच्या बाजूला भुजबळ लेआऊटमधील रहिवासी होता. तेथेच राहणा-या नरेश लक्ष्मण बाहेकरने (वय २६) त्याची हत्या केली आहे. 
 
किरण आणि नरेश एकमेकांचे चांगले मित्र होते.  आरोपी वाहनचालक आहे. नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हे दोघे अन्य मित्रांसोबत दारू पीत बसले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर नरेशने किरणला बेदम मारहाण केली. यावेळी अन्य मित्रांनी मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. काही वेळेनंतर पुन्हा दोघांत बाचाबाची झाली. यावेळी पुन्हा आरोपी बाहेकरने किरणवर हात उगारला. किरणनेही आरोपीला एक थापड मारली. त्यानंतर आरोपी पाहून घेण्याची धमकी देऊन निघून गेला.
 
काही वेळेनंतर खर्रा खाऊन येऊ म्हणत किरण अन्य दोन मित्रांच्या सोबत दुचाकीवर बसून गेला. तिकडे त्रिमुर्ती नगर, गजानन मंदिराजवळच्या मैदानात घात लावून बसलेल्या आरोपी बाहेकरने किरणवर भाजी कापण्याच्या पावशीने वार करून त्याला रक्तबंबाळ केले
 
 त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. पहाटे २ ते २.३० वाजता माहिती कळाल्यानंतर प्रतापनगर पोलीस किरणच्या घरी पोहचले. किरणचे वडील सदाशिव मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बाहेरकरला अटक केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.