नागपूर : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण व ओंकारनगर, हुडकेश्वर, धंतोली व लक्ष्मीनगर जलकुंभ हे गोधनी येथील नवनिर्मित पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याने भरणे यासाठी नागपूर महानगरपालिका पेंच प्रकल्प सेल व आॅरेंज सिटी वॉटर प्रा. लि. यांनी संयुक्तपणे २ बटरफ्लायर व्हॉल्व बसविणे यासह महत्त्वाची आंतरजोडणीची कामे १० एप्रिल रोजी हाती घेतली आहेत.१० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या २४ तासाच्या शटडाऊन दरम्यान सेमिनरी हिल्स ते राजभवन या दरम्यानचा पाणी पुरवठा बाधित राहील. या काळात १२०० मिमी व्यासाच्या सेमिनरी हिल्स ते राजभवन दरम्यानच्या पाईपलाईन, १२०० मिमी व्यासाचे २ बटरफ्लाय व्हॉल्व बसविणे (एक ओसीडब्ल्यूकडून तर एक पेंच प्रकल्प सेलकडून), १४२२ मिमी व्यासाच्या गोधनी फिडर मेनला १२०० मिमी व्यासाच्या सेमिनरी हिल्स ते राजभवन दरम्यानच्या पाईपलाईनसोबत व ११०० मिमी व्यासाच्या ओंकारनगर फिडर पाईपसोबत जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ओंकारनगर जलकुंभ, वंजारीनगर जलकुंभ, हुडकेश्वर, बोरियापुरा ६०० मिनी फिडर मेन, बर्डी, धंतोली, रेशीमबाग, छावणी, सदर येथील जलकुंभ व सप्लाय लाईन्सवरून पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी शहरातील बऱ्याच मोठ्या भागातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. त्याचप्रमाणे टँकरनेही पाणी पुरवठा शक्य होणार नसल्याचे ओसीडब्ल्यूने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मिशन
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST