शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन’ संत्रा बचाव

By admin | Updated: March 30, 2017 02:38 IST

विदर्भातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने वैधानिक विकास मंडळाने पुढाकार घेऊन संत्रा उत्पादकांच्या

वैधानिक विकास मंडळाचा पुढाकार : राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र तयार करणार अहवाल नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने वैधानिक विकास मंडळाने पुढाकार घेऊन संत्रा उत्पादकांच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रामार्फत अहवाल तयार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षामध्ये अपेक्षित वाढ तसेच संत्रा उत्पादकांच्या समस्या कमी करण्यासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. तसेच विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि वृध्दी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे. विदर्भ विकास मंडळाची बैठक बुधवारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपरोक्त माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सचिव अ‍ॅड. मधुकर किंमतकर, डॉ. कपिल चंद्रायण, डॉ. आनंद बंग, डॉ. रवींद्र कोल्हे तसेच मंडळाच्या सदस्य सचिव व अप्पर आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यावेळी उपस्थित होते. विदर्भ विकास मंडळातर्फे विविध समित्यामार्फत आणि तज्ज्ञ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्रात आवश्यक सुधारणांसह करावयाच्या उपाययोजना तसेच धोरण या संदर्भात अभ्यास करून राज्यपालांना मागील दोन वर्षात २२ अहवाल सादर केले आहेत. या अहवालाच्या माध्यमातून विदर्भातील अनुशेषांतर्गत तसेच विशेष उपक्रमांसाठी योजना तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीसह प्रस्ताव मान्य झाले आहेत. विदर्भ विकास मंडळातर्फे यावर्षी विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांबाबत अभ्यास करण्यासाठी नऊ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. विदर्भात संत्रा उत्पादन कमी होत असल्याची कारणे आणि सद्यस्थिती, वापरात असलेले तंत्रज्ञानाचे विश्लेषण करून व उपलब्ध साधनांचा वापर करून पुढील पाच वर्षांमध्ये अपेक्षित वाढ घडवून आणण्यासाठी तसेच संत्रा उत्पादकांच्या समस्या कमी करण्यासाठी अहवाल तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. हा अहवाल एक वर्षात सादर होणार असल्याची माहिती अध्यक्ष अनुपकुमार यांनी दिली. बैठकीत मंडळाचे सदस्य डॉ. आनंद बंग, डॉ. कपिल चंद्रायण तसेच डॉ. मधुकर किंमतकर यांनी विदर्भ विकास मंडळातर्फे विदर्भातील विविध विषयासंदर्भात मंडळाने तयार केलेल्या अहवालानुसार राज्यपालांकडून निधी वाटपासंदर्भात शासनाला सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे वक्तव्य केले. विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी उपलब्ध निधी तसेच निधी अनुशेषांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी तसेच निधी वाटपाचे सूत्र यावर चर्चा करण्यात आली. अप्पर वैनगंगा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाल्यास यवतमाळ, चंद्र्रपूर, गडचिरोली जिल्ह्यालाही लाभ होणार आहे. विदर्भातील ग्रामीण रस्त्यांचा अनुशेष, शेतीला जोडणारे पांदण रस्ते आदी विषयावरही यावेळी चर्चा झाली.(प्रतिनिधी)