शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांची दिशाभूल

By admin | Updated: September 29, 2015 04:39 IST

गडरलाईन तुंबल्यानंतर तक्रार केली तर मनपाचे सफाई कर्मचारी ती साफ करतात. परंतु किंग्जवे मार्गावरील सेंट्रल

नागपूर : गडरलाईन तुंबल्यानंतर तक्रार केली तर मनपाचे सफाई कर्मचारी ती साफ करतात. परंतु किंग्जवे मार्गावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना गेल्या दोन आठवड्यापासून गडरलाईनच्या दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बँक कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतरही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना मनपा मुख्यालयात विविध विभागाच्या चकरा माराव्या लागत आहेत. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी तुंबलेली गडरलाईन साफ न करताच साफ केल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देऊ न त्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.दोन आठवड्यापासून गडरलाईन तुंबल्याची समस्या न सुटल्याने बँके चे सहायक प्रबंधक आर.बी. सोनवणे यांनी यासंदर्भात थेट श्रावण हर्डीकर यांच्याकडे २२ सप्टेेंबरला तक्रार केली. याची प्रतिलिपी आरोग्य विभागालाही पाठविण्यात आली. तसेच मंगळवारी झोन व विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आल्या. परंतु तक्रारीनंतरही समस्या न सुटल्याने सोनवणे मनपा मुख्यालयात आले. त्यांनी हर्डीकर यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. परंतु नेहमीप्रमाणे बैठकीत व्यस्त असल्याचे कारण सांगून भेटण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर सोनवणे आरोग्य विभागात पोहचले. परंतु हे प्रकरण बांधकाम विभागाशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते कार्यकारी अभियंता वारके यांच्याकडे गेले. परंतु ही समस्या राज्य सरकारच्या बांधकाम विभागाशी संबंधित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. वारके यांनी बँकेला भेट देऊ न माहिती जाणून घेतली. परंतु तुंबलेली गडरलाईन साफ क रण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नाहीत. दरम्यान, समस्या कायम असतानाही सोनवणे यांच्या मोबाईलवर आयुक्तांनी मेसेज पाठविला की, तुमची समस्या सोडविण्यात आली. मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनीही बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. रस्त्यालगतचे चेंबर उघडण्यासाठी बांधकाम विभागाच्या अनुमतीची गरज असल्याचे चुकीचे सांगण्यात आले. वास्तविक ही मनपाचीच जबाबदारी असून मनपालाच सर्व अधिकार आहेत. (प्रतिनिधी)प्रभागाचे सदस्य आहेत कुठे?ही बँक सिव्हिल लाईन प्रभागात येत असल्याने प्रभागाच्या नगरसेवकांकडे बँक कर्मचाऱ्यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वारंवार फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांचे कार्यालय गाठले. परंतु भेटच होत नसल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.