शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:15 IST

आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

ठळक मुद्देमुख्य आरोपीसह तिघांना अटक : अपहृताची सुटका

ऑनलाईन लोकमत नागपूर : आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.राहुल धनराज हाथीबेड (२१), आश्विन अशोक देशमुख (१९) सतीश जगदीश मेश्राम (२१) रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पीडित १६ वर्षाचा विद्यार्थी आदित्य इशेंद्र मिश्रा हा बारावीचा विद्यार्थी आहे. आदित्यची हिमांशु हिरणवार नावाच्या मित्राच्या माध्यमातून राहुलशी ओळख झाली होती. काही दिवसांपासून कोणत्यातरी गोष्टीवरून राहुल आणि आदित्यमध्ये वाद सुरु होता. राहुलने त्याला वर्डशॉप मेसेज पाठवून धमकी दिली होती. तो आदित्यला ‘तेरे मे दम है तो सुभाषनगर मे आ’ अशी धमकी देत होता. सोमवारी दुपारी १२.३० वाजता आदित्य भाऊराव सुर्वे उद्यानात आला होता. त्याच्यासोबत हिमांशुही होता. याची माहिती मिळताच राहुल दोन्ही साथीदारांसोबत उद्यानात पोहोचला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि दंड्याने आदित्यला मारहाण केली. जखमी केल्यानंतर त्याला अ‍ॅक्टीव्हावर बसवून सुभाषनगरकडे घेऊन गेले. पुढे धोका असल्याचे पाहून हिमांशुने पोलिसांना सूचना दिली. प्रतापनगर पोलिसांनी सुभाषनगर चौकाजवळ आरोपींना अटक करून आदित्यला त्यांच्या तावडीतून सोडविले. पोलिसांनी अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरण