शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये छोट्या विमानांची देखभाल-दुरुस्ती

By admin | Updated: April 1, 2016 03:23 IST

मिहान प्रकल्पात एअर इंडियाच्या एमआरओनंतर आता छोट्या विमानांची देखभाल, दुरुस्ती व उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा आपले पाऊल पुढे टाकत आहे.

इंडामेर व मॅक्स एअरोस्पेस सुरूकरणार काम : चार एकर जागा घेतलीनागपूर : मिहान प्रकल्पात एअर इंडियाच्या एमआरओनंतर आता छोट्या विमानांची देखभाल, दुरुस्ती व उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यासुद्धा आपले पाऊल पुढे टाकत आहे. यापूर्वी जागा घेऊनही बांधकाम सुरू न करणाऱ्या कंपन्या आता त्याच जागेवर कामाला सुरुवात करू शकतात. यात इंडामेर आणि मॅक्स एअरोस्पेस या कंपन्यांचा समावेश आहे. इंडामेर व मॅक्स एअरोस्पेस या दोन्ही कंपन्यांनी मिहानमध्ये प्रत्येकी ४ एकर जागा घेतली आहे. यात इंडामेर छोटे प्रायव्हेट जेटच्या देखभाल दुरुस्तीचे काम पाहते. मॅक्स एअरोस्पेसने यापूर्वी १५ एकर जागा घेतली होती. यासाठी कंपनीने २० टक्के रक्कम सुद्धा भरली आहे. परंतु आता त्या कंपनीने मिहानमध्ये केवळ लहान विमानांच्या इंजिनच्या दुरुस्तीसाठी ४ एकर जागेत एमआरओ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम मॅक्स एअरोस्पेस अंतर्गत दुसरी कंपनी करणार आहे. गेल्या वर्षी रिलायन्स एअरो स्ट्रक्चर्सतर्फे मिहानमध्ये जागा घेतल्यानंतर या कंपन्यांनी सुद्धा बांधकामाची तयारी सुरू केली आहे. रिलायन्स एअरो स्ट्रक्चर्सने मिहानमध्ये १०४ एकर जागा घेतली आहे. परंतु बांधकाम सुरू करण्याबाबत मात्र सध्या कुठलीही तयारी स्पष्ट झालेली नाही. या कंपनीने मिहानमध्ये हेलिकॉप्टर व सेनेच्या विमानांना लागणारे उपकरण तयार करण्यासाठी जागा घेतली आहे. (प्रतिनिधी)